'दिल्लीने स्पष्ट सांगितलंय छोट्या मोठ्या गोष्टी महाराष्ट्रातच..', शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis on Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीतील वाद सोडवण्यासाठी किंवा त्यांच्या मागण्यांसाठी मांडण्यासाठी दिल्ली दौरे करतात, अशी चर्चा असते. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेटपणे भाष्य केलंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'दिल्लीने स्पष्ट सांगितलंय छोट्या मोठ्या गोष्टी महाराष्ट्रातच..',
शिंदेंच्या दिल्लीवारीवरुन फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis on Eknath Shinde, मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीतील वाद सोडवण्यासाठी किंवा त्यांच्या मागण्या मांडण्यासाठी वारंवार दिल्ली दौरे करतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होत असते. या चर्चेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे. 'मुंबई Tak'च्या 'बैठक' कार्यक्रमात बोलताना त्यांनी या विषयावर स्पष्ट भूमिका मांडली. ते नेमकं काय म्हणाले? जाणून घेऊयात..
हेही वाचा : 'जेव्हा प्रेमाची गरज होती, तेव्हा प्रेमभंग केला..' मुंबई Tak बैठकीत CM फडणवीसांचे ठाकरेंना टोल्यांवर टोले!
शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, "दिल्लीत कुठलीही भांडणे सुटत नाहीत. दिल्लीने हे स्पष्टपणे सांगितलंय की, या छोट्या-मोठ्या गोष्टी तुम्हाला महाराष्ट्रातच करायच्या आहेत. दिल्लीला फार काम आहेत. दिल्ली या गोष्टी एंटरटेन करत नाही. हे जे काही असतं त्याचे निर्णय महाराष्ट्रातच होतात. हा मेसेज सगळीकडे योग्यपणे पोहोचलेला आहे."
हेही वाचा : Mumbai Tak Baithak : 'एकही दिवस सरकारला झोपू दिलं नाही', फडणवीसांनी सांगितलं भाजप न फुटण्याचं टॉप सीक्रेट!









