एड्स बाधित महिलेवर कथित बलात्कार, न्यायालयाने आरोपीला निर्दोष सोडताना कोणती कारणं दिली?
mumbai sessions court acquits rape accused : मुंबई सत्र न्यायालयाने कथित बलात्कारप्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. तक्रारदार महिला अनेक वर्षांपासून बेपत्ता असल्याने आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
एड्स बाधित महिलेवर कथित बलात्कार
न्यायालयाने आरोपीला निर्दोष सोडताना कोणती कारणं दिली?
mumbai sessions court acquits rape accused : मुंबईतील एका कथित बलात्कार प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणातील तक्रारदार महिला अनेक वर्षांपासून बेपत्ता असल्याने तिच्या अनुपस्थितीत आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक आणि पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने आपल्या निरीक्षणात म्हटले की, या प्रकरणात पीडित महिलेची साक्ष ही सर्वांत महत्त्वाची होती. मात्र, तीच न्यायालयासमोर उपलब्ध नसल्यामुळे सरकारी पक्षाला आपला दावा सिद्ध करता आला नाही. त्यामुळे आरोपीला सर्व आरोपांतून मुक्त करण्यात आले.
हेही वाचा : "भाजपचं दार बंदच, ज्यांना जायचं त्यांनी..."; देवेंद्र फडणवीसांनी पक्षफुटीवर केलं भाष्य
गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा आरोप
हे प्रकरण त्या महिलेशी संबंधित आहे, जी पतीसोबत झालेल्या वादानंतर घर सोडून निघून गेली होती. सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, महिलेने आरोप केला होता की एका व्यक्तीने तिला आपल्या बसमध्ये बसवून तिच्या घरी सोडण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तिला शीतपेयामध्ये गुंगीचे औषध देण्यात आले आणि ती बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. मात्र, या प्रकरणातील दीर्घ न्यायालयीन प्रक्रियेनंतर अखेर मुंबई सत्र न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
हेही वाचा : Mumbai Tak Baithak : 'एकही दिवस सरकारला झोपू दिलं नाही', फडणवीसांनी सांगितलं भाजप न फुटण्याचं टॉप सीक्रेट!









