चेतन की सिया? केतनला गडावरून कोणी ढकललं? असं उलगडणार सत्य

मुंबई तक

Ketan Agrawal murder case : केतन अग्रवाल हत्याप्रकरणात आरोपी चेतन चौधरीला लोहगड किल्ल्यावर नेऊन क्राइम रिक्रिएशन करण्यात आले. केतनला अंतिम धक्का सिया की चेतनने दिला, याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी घटनाक्रमाचे रिक्रिएशन केले.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

चेतन की सिया? केतनला गडावरून कोणी ढकललं?

point

असं उलगडणार सत्य

Ketan Agrawal murder case : पुण्यातील उद्योजक केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासात पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलत आरोपी चेतन चौधरीला लोहगड किल्ल्यावर नेऊन क्राइम रिक्रिएशन केले. सकाळी सुमारे 8 वाजता लोणावळा ग्रामीण पोलिसांनी चेतनला घटनास्थळी नेले आणि सुमारे अडीच तास ही प्रक्रिया सुरू होती. सकाळी साडेदहा वाजेपर्यंत घटनाक्रमाचे रिक्रिएशन करण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेनंतर चेतनला पुन्हा लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यावर पावसाचं मोठं संकट, 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

डमी पुतळा घेऊन घटनेचं रिक्रिएशन

क्राइम रिक्रिएशनदरम्यान पोलिसांनी केतनच्या वजनाइतकाच एक डमी पुतळा सोबत नेला होता. चेतनने या डमीला सुमारे 300 ते 400 फूट खोल दरीत ढकलून घटनाक्रमाचे रिक्रिएशन करण्यात आले. या प्रक्रियेद्वारे केतनला अंतिम धक्का नेमका कोणी दिला, याचा तपास पोलिस करत आहेत. केतन आणि सिया यांच्या मागून चेतन कसा चालत होता, त्यानंतर नेमका घटनाक्रम कसा घडला, हे पोलिसांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : Mumbai Tak Baithak 2026 Schedule: महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेने.. काय असणार विकासाचा अजेंडा? ‘मुंबई Tak बैठक’मध्ये दिग्गजांचं व्हिजन

हे वाचलं का?