शाळेतील विद्यार्थी मित्राला समलैंगिक संबंधासाठी विचारलं, नकार देताच..

मुंबई तक

Crime News : 17 वर्षीय विद्यार्थ्याने दुसऱ्या अल्पवयीन मुलाशी समलैंगिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली. मुलाने विरोध केला असता, त्याचा टॉवेलनं गळा आवळून त्याची हत्या केली, नेमकं काय घडलं जाणून घ्या.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

विद्यार्थ्याकडून अल्पवयीन मुलाशी समलैंगिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती

point

आरोपी अटकेत

Crime News : तामिळनाडू राज्यातील पुदुक्कोई जिल्ह्यात अल्पवयीन विद्यार्थ्याची हत्या केली. हत्येमागील धक्कादायक कारण समोर आलं आहे. हत्या करण्यात आलेल्या मुलाचं वय 17 वर्षे आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली. मुलगा अल्पवयीन असल्याने अत्याचार केल्याप्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे ही वाचा :  Astrology : आषाढ महिन्यात 'या' राशी होणार मालामाल

17 वर्षीय विद्यार्थ्याकडून अल्पवयीन मुलाशी समलैंगिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती

पोलिसांच्या माहितीनुसार, 17 वर्षीय विद्यार्थ्याने दुसऱ्या अल्पवयीन मुलाशी समलैंगिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली. मुलाने विरोध केला असता, त्याचा टॉवेलनं गळा आवळून त्याची हत्या केली. एका वृत्त माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आरोपी हा अल्पवयीन विद्यार्थी त्याच्याच ओळखीच्या मित्राला निर्जनस्थळी घेऊन गेला. तेव्हा शरीरसंबंध बनवण्यास त्याने दबाव आणला, अल्पवयीन मुलाने नकार दिल्यानंतर त्याचा टॉवेलने गळफास घेतला. 

हे ही वाचा :  आधी पवार आता ठाकरेंची साथ सोडली, कोण आहेत सचिन अहिर? आदित्य ठाकरेंची वाट बिकट होणार?

17 वर्षीय आरोपी तरुणाला अटक

पोलिसांनी 17 वर्षीय आरोपी मुलाला अटक केली होती. आरोपी हा अल्पवयीन असून त्याच्यावर हत्या आणि लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला होता. आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्यात आले, तसेच आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. 

हे वाचलं का?