आधी पवार आता ठाकरेंची साथ सोडली, कोण आहेत सचिन अहिर? आदित्य ठाकरेंची वाट बिकट होणार?
Who is Sachin Ahir : सचिन अहिर यांनी ठाकरेेंची साथ सोडत शिंदेसेनेत प्रवेश केलाय. त्यानंतर त्यांना थेट विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आधी पवार आता ठाकरेंची साथ सोडली
आदित्य ठाकरेंची वाट बिकट होणार? कोण आहेत सचिन आहेर?
Who is Sachin Ahir : ठाकरेंच्या शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार आणि आदित्य ठाकरेंचे विश्वासू सहकारी सचिन अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. ठाकरेंची साथ सोडून आलेल्या सचिन अहिर यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून थेट विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. हा ठाकरेंच्या शिवसेनेसाठी तगडा झटका मानला जातोय. शिवाय, अहिर यांच्या जाण्याने आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील अडचणी काही प्रमाणात वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा : 'तुझ्यासारखे हजार नवरे करु शकते..' प्रेग्नंट बायको अन् नवऱ्याचा वाद, पुढं काय घडलं?
सचिन अहिर कोण आहेत?
सचिन अहिर कामगारांचे नेते म्हणून ओळखले जायचे. 1999 मध्ये शिवडीतून पहिल्यांदा आमदार म्हणून ते निवडून आले. त्यानंतर 2004 मध्ये ते याच मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार झाले. यानंतर 2009 मध्ये वरळी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले होतं. दरम्यान, यानंतर त्यांच्यावर गृहनिर्माण राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पक्ष सोडला. राष्ट्रवादीला या निवडणुकीपूर्वी मातब्बर नेते सोडून गेले होते. यामध्ये सचिन अहिर यांचाही समावेश होता. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत सचिन अहिर शिवबंधन बांधलं होतं. मात्र, आता बरोबर 7 वर्षांनी अहिर यांनी त्यांची साथ सोडलीये.
हेही वाचा : 'पीएम मोदी अन् त्यांचं मंत्रिमंडळ अवाक्षर...', राम मंदिरातील अपहारावरुन ठाकरेंची पोस्ट









