'पीएम मोदी अन् त्यांचं मंत्रिमंडळ अवाक्षर...', राम मंदिरातील अपहारावरुन ठाकरेंची पोस्ट
Raj Thackeray On Shree Ram Mandir : आयोध्येतील झालेल्या राम मंदिरातील चोरी प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरेंनी पीएम नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना बेधडक सवाल केले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी
प्राणप्रतिष्ठापनेची वेळ आली तेंव्हा मात्र पंतप्रधानांनी एकट्याने त्याची पूजा केली
Raj Thackeray On Shree Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरात भाविकांनी अर्पण केलेलं दान आणि देणगीची चोरी झाल्याचा प्रकार समोर आल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या तपासाला वेग देण्यात आला असून, विशेष तपास पथकाने (SIT) आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार व्यवस्थापनाची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरेंनी पीएम नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना बेधडक सवाल केले आहेत.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंना तगडा झटका, सचिन अहिर शिंदेसेनेत; थेट उपसभापतीपदासाठी अर्ज भरला
राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या हुंडीत जमा होणारे दान, देणगी स्वरूपात येणारा निधी, दागदागिने यांचा कुठलाही धड हिशोब राखला जात नाहीये, आणि त्यात अपहार झाल्याची स्पष्ट शक्यता वर्तवली जात आहे. या सगळ्याचा तपास करणाऱ्या एसआयटीनेच त्यांच्या प्राथमिक अहवालात याची पुष्टी केली, काही आरोपी पकडले गेले.
बातमी आलेल्या दिवसापासून यावर काही लिहावं असं वाटत होतं परंतू प्रकरण कसं पुढे सरकतंय आणि बातमीच्या ओळींमागे काय लपलंय ते जरा पहात होतो . या विषयवार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं प्रसिद्ध मौन बाळगलं आहे. नरेंद्र मोदीच काय पण भारतीय जनता पक्षाचे सरकारमध्ये मंत्री पदावर असलेली एकही व्यक्ती अवाक्षर काढत नाहीये. प्रभू रामचंद्रांचं नाव घेऊन जे सत्तेच्या सिंहासनावर आरूढ झाले त्यांना या अपहाराविषयी काहीच वाटत नाही? दुसऱ्या पक्षाचे खासदार, आमदार, पदाधिकारी यांची पळवापळवी करता करता या सगळ्याची इतकी सवय झाली किंवा मन कोडगं झालंय की देवाच्या दारात झालेल्या भक्तांच्या दानाच्या पळवापळवीचं पण काही वाटणं बंद झालं आहे का? का अयोध्या ज्या लोकसभा मतदारसंघात येतं तिथेच २०२४ मध्ये भाजपला लोकांनी नाकारले म्हणून रामाला पुन्हा वनवासात ढकललं जात आहे?
अयोध्येत राममंदिर उभं राहिलं तेंव्हा या देशातील कोट्यवधी हिंदूंना परमोच्च आनंद झाला होता. आपल्या मर्यादापुरुषोत्तमाच्या जन्मस्थानाच्या जागी देऊळ पाडून, काही शतकांपूर्वी तिथे मस्जिद उभारली गेली. पुढे अनेक शतकं हिंदूंच्या मनाला या गोष्टीचा खेद होता. पुढे 1980 च्या दशकांत विश्व हिंदू परिषद आणि इतर संघटनांनी रामजन्मभूमी आंदोलन उभं केलं. आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक अस्मितेसाठी देशातील हिंदू या आंदोलनाच्या मागे उभा राहिला. सामान्य हिंदू माणसांनी या आंदोलनाला आर्थिक बळ दिलं, करसेवकांनी सेवा दिली, इतकंच काय असंख्य करसेवकांचा जीव यांत गेला. शरयू नदीत तरंगणारी त्यांची शवं आज देखील स्मरणात आहेत.









