समजून घ्या: भाजप आमदारालाच सोबत घेऊन शिंदेंनी कसं केलं 'ते' ऑपरेशन लोट्स?
ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी केंद्रीय मंत्री तसेच भाजप नेते कपिल पाटील यांना धक्का दिला.
ADVERTISEMENT

मुंबई: अलीकडेच शिवसेना (शिंदे गट) राबवत असलेल्या 'ऑपरेशन टायगर'ची राज्यभर चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदार शिंदे गटात दाखल झाल्यानंतर या राजकीय मोहिमेची जोरदार चर्चा रंगली. मात्र, याच काळात ठाणे-पालघरमध्ये आणखी एक वेगळी राजकीय मोहीम शांतपणे सुरू होती. ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत घडलेल्या घडामोडींमुळे महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
ही निवडणूक वरवर पाहता एका जिल्हा बँकेची असली, तरी तिच्यामागे महायुतीतील भाजप आणि शिवसेनेमधील वाढत्या वर्चस्वाच्या संघर्षाची छाया स्पष्टपणे दिसून आली.
शिंदे विरुद्ध रवींद्र चव्हाण असा सामना
या निवडणुकीत एका बाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण. त्यामुळे ही लढत प्रत्यक्षात ठाणे जिल्ह्यातील भाजप विरुद्ध शिवसेना असा रंग घेताना दिसली.
हे ही वाचा>> समजून घ्या: ठाकरेंच्या खासदारांनंतर आता नंबर नगरसेवकांचा? निधी वाटपातला भेदभाव पाहा!
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर ठाणे जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व वाढत असल्याचा दावा केला जात असताना, या निवडणुकीत शिवसेनेने स्वतःची ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.









