कैलास गोरंट्याल यांचा तुफान डान्स; कार्यकर्त्यांकडून पैशांची उधळण, व्हिडिओ व्हायरल

Kailas Gorantyal : जालन्यातील नवरात्रीच्या कार्यक्रमात भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनी गाण्यांवर डान्स केला. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर पैसे उधळले असून, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ADVERTISEMENT

Kailas Gorantyal
Kailas Gorantyal
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

कैलास गोरंट्याल यांचा तुफान डान्स

point

कार्यकर्त्यांकडून पैशांची उधळण, व्हिडिओ व्हायरल

Kailas Gorantyal : जालन्यात भाजप नेते आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी तुफान डान्स केलाय. त्यांच्या हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर पैसे उधळलेले पाहायला मिळाले. यावेळी गोरंट्याल तुफान डान्स करताना पाहायला मिळत होते. नवरात्रीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हा डान्स केला. 

जालना शहरात काल रात्री आयोजित करण्यात आलेल्या नवरात्रीच्या कार्यक्रमात माजी आमदार तथा भाजप नेते कैलास गोरंट्याल सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांनी गाण्यांवर ठेका धरला. गोरंट्याल यांचा डान्स पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर पैशांची उधळण केली. त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाचा सामना करत असताना कैलास गोरंट्याल यांनी डान्स केल्याने त्यांना ट्रोलिंगला देखील सामोरे जावे लागत आहे. नेटकऱ्यांनी त्यांच्या डान्सवर नाराजी व्यक्त केलीये. 

हेही वाचा : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, दिवाळीपूर्वी अतिरिक्त रक्क्म थेट खात्यात...

कोण आहेत कैलास गोरंट्याल?

कैलास गोरंट्याल हे जालना विधानसभा मतदारसंघाचं तीन वेळा प्रतिनिधित्व केलेले नेते आहेत. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी जालना मतदारसंघातून आमदार म्हणून काम पाहिलं. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सलग तीन वेळा आमदार राहिलेल्या गोरंट्याल यांच्यासाठी हा पराभव राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरला. या पराभवानंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे जालन्याच्या राजकारणात त्यांच्या पक्षबदलाची चर्चा झाली. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गोरंट्याल यांच्या राजकीय भूमिकेकडे आणि आगामी राजकीय वाटचालीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

जालन्याच्या राजकारणात कैलास गोरंट्याल यांचं नाव प्रामुख्याने शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्याशी असलेल्या राजकीय संघर्षामुळेही चर्चेत असतं. जालना जिल्ह्यात खोतकर विरुद्ध गोरंट्याल हा पारंपरिक राजकीय संघर्ष मानला जातो. दोन्ही नेत्यांमधील राजकीय स्पर्धेमुळे जालन्यातील राजकीय घडामोडींना वेगळं महत्त्व प्राप्त होतं. एका बाजूला अर्जुन खोतकर हे शिंदेंच्या शिवसेनेत सक्रिय आहेत, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले कैलास गोरंट्याल यांची राजकीय वाटचाल सुरू आहे.