ओमराजे निघून गेले, ठाकरेंसोबत किती शिवसैनिक? मतदारसंघातून ग्राऊंड रिपोर्ट

मुंबई तक

dharashiv politics : ओमराजे निंबाळकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी शिवसैनिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. निष्ठा, गद्दारी आणि 2029 च्या निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.

ADVERTISEMENT

dharashiv politics
dharashiv politics
google news

बातम्या हायलाइट

point

ओमराजे निघून गेले, ठाकरेंसोबत किती शिवसैनिक?

point

मतदारसंघातून ग्राऊंड रिपोर्ट

dharashiv politics : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी शिवसैनिकांमध्ये तीव्र भावना व्यक्त होताना दिसल्या. 'मुंबई Tak' ने उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी सभा स्थळी उपस्थित असलेल्या शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी अनेक शिवसैनिकांनी आपण 1984 पासून शिवसेनेत कार्यरत असून आपली निष्ठा ही व्यक्तीशी नव्हे तर ठाकरे परिवाराशी असल्याचे सांगितले. ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी नव्हे तर उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसाठी आपण काम केले असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला. त्यांनी ओमराजे यांच्या पक्षांतराला गद्दारी संबोधत त्यांच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात विजांसह पाऊस घालणार धिंगाणा, 'या' जिल्ह्यांवर आस्मानी संकट

'ओमराजे निंबाळकर यांच्या विजयामागे सर्वसामान्य शिवसैनिकांचे योगदान'

संवादादरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या विजयामागे सर्वसामान्य शिवसैनिकांचे योगदान असल्याचे सांगितले. निवडणुकीत कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खिशातून खर्च केला, काहींनी आपल्या मुलांनी गल्ल्यातून काढलेले पैसेही प्रचारासाठी दिल्याचा उल्लेख केला. ओमराजे यांना मिळालेले साडेतीन लाख मतांचे मताधिक्य हे पैशामुळे नव्हे तर शिवसैनिकांच्या निष्ठेमुळे मिळाले असल्याचा दावा करण्यात आला. काही कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडून खर्च झालेल्या पैशांचा उल्लेख करत आता त्या विश्वासाला तडा गेल्याची भावना व्यक्त केली.

हेही वाचा : डमी पुतळा, सियाला लोहगडावर आणलं, पोलिसांना काय तपासलं?

हे वाचलं का?