'बीजेपी नाही, ही बाबर जनता पार्टी, ओमराजेंच्या मतदारसंघात ठाकरे कडाडले

Uddhav Thackeray : 'ही बीजेपी नाही,तर बाबर जनता पार्टी आहे, ही सगळी फसवणूक सुरू आहे. हाच गद्दार लोकसभेत गेल्यानंतर राम मंदिरात झालेल्या चोरीबाबत उत्तर विचारण्यासाठी धाडस करणार आहे का?', असा तिखट प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला.

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

'त्यांना महाराष्ट्र धर्म संपवायचाय,  मराठी माणूस संपवायचाय...'

point

'हिंदुहृदय सम्राट हे एकच होते ते बाळासाहेब ठाकरे'

point

'ही बीजेपी नाही,तर बाबर जनता पार्टी'

Uddhav Thackeray : 'ही बीजेपी नसून, बाबर जनता पार्टी आहे, ही सगळी फसवणूक सुरूये. या गद्दारांची हिंमत आहे का, जर  हाच गद्दार लोकसभेत गेल्यावर राम मंदिरात झालेल्या चोरीबाबत उत्तर विचारायचं म्हटलं तर धाडस करणार का?  जे धाडस आपले शिवसेनेचे खासदार करतील, तेच गद्दार खासदार हे धाडस करतील का?', असा प्रश्न करत त्यांनी धाराशिव मतदारसंघात 28 जून 2026 रोजी उपस्थितांना संबोधित करत भाजपसह शिवसेना शिंदे गटावर टीकेची तोफ डागली. 

हे ही वाचा : चंद्रपूर : पाच वर्षीय चिमुरडीवर 65 वर्षीय वृद्धाचा बलात्कार.. भयंकर घटना

'त्यांना महाराष्ट्र धर्म संपवायचाय,  मराठी माणूस संपवायचाय...'

पुढे ते म्हणाले की, 'त्यांना महाराष्ट्र धर्म संपवायचाय, मराठी माणूस संपवायचाय. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वाभीमान भिनवलेला आहे, देशप्रेम संपवायचं आहे. त्यांना महाराष्ट्रातून उद्योगधंदे गुजरातला न्यायचे आहेत. गेल्या दहा वर्षात या धाराशिवमध्ये किती कारखाने आले? एक तरी कंपनी आली? सर्वकाही गुजरातला दिलंय, नाशिकच्या होणाऱ्या कुंभमेळ्याचं कॉन्ट्रॅक्ट देखील गुजरातला दिलंय.' 

'हिंदुहृदय सम्राट हे एकच होते ते बाळासाहेब ठाकरे'

'महाराष्ट्रातील एकही स्वाभिमानी शिल्लक ठेवायचा नाही. हा स्वाभिमान कधी संपेल, जेव्हा शिवसेना संपले आणि शिवसेना संपेल तेव्हा हे सर्व काही होईल, त्यासाठीच ही फोडाफोडी सुरूये. ठाकरे का नाही संपत? कारण हिंदुहृदय सम्राट हे एकच होते ते बाळासाहेब ठाकरे. ते जोवर तुमच्या मनात आहेत तोवर तुम्ही त्यांना संपवू शकत नाहीत, आम्ही जोडले गेलेली माणसं आहोत,' असं म्हणत त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. 

'चाळीस आमदार फोडले शिवसेना संपली, नऊ खासदार आले. परत त्यातील सहा खासदार फोडले. शिवसेना फोडली मग समोर काय आहे. बाळासाहेबांची शिवसेना ही आमदार-खासदारांमध्ये नाही, ती शिवसेना लोकांच्या घरोघरी पोहोचली आहे. नुसती मनकी बात बोलून चालत नाही, दिल की बात बोलावी लागते.' 

'भाव वाढवला आणि तो (ओमराजे) देखील गेला'

'बाकीच्या 5 जणांचं ठरलं होतं, इकडचा एक फक्त उरला होता. भाव वाढवला आणि तो (ओमराजे) देखील गेला. आपले दोन खासदार ओम बिर्ला यांना भेटण्यासाठी गेले होते, त्यांना घटनेचं पुस्तक दिलं. त्या घटनेच्या पुस्तकात दोन तृतीयांश बहुमत जरी तिकडे गेले तरीही पक्षात विलीन होऊ शकत नाहीत याचा अधिकार हा पक्षाला असतो,' असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

हे ही वाचा : फडणवीसांबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा, परभणीच्या सभेत काय म्हणाले?

'शेतकऱ्याच्या हमीभावाला दाम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व' 

'पाकव्याप्त काश्मीरमध्ये तुम्ही सैन्य घुसवा हा उद्धव ठाकरे तुम्हाला पाठिंबा देतो. तुम्हाला याच्या त्याच्या पाठिंब्याची गरज लागणार नाही. फक्त कोणी पीक विम्याचा प्रश्न केला की, जय श्री राम... शेतमालाला हमीभाव कधी मिळणार? जय श्री राम... समाधानच्या कुटुंबियांना न्याय कधी मिळणार? जय श्रीराम... हे हिंदुत्व मान्य नाही. आम्ही पण प्रभू रामाला मानतो, आमच्या हृदयात राम, शेतकऱ्याच्या हमीभावाला दाम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे,' असं म्हणत त्यांनी भाजपसह शिंदे गटावर हल्ला चढवला.