चंद्रपूर : पाच वर्षीय चिमुरडीवर 65 वर्षीय वृद्धाचा बलात्कार.. भयंकर घटना

मुंबई तक

Chandrapur Crime : चंद्रपूरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका पाच वर्षीय चिमुरडीवर 65 वर्षीय रिटायर्ड वृद्धाने लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणात पीडित चिमुरडीने आईच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनं परिसर पूरता हादरून गेला आहे. 

ADVERTISEMENT

Chandrapur Crime
Chandrapur Crime
Google CTA

बातम्या हायलाइट

point

5 वर्षीय पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार 

point

आइसक्रीम खाण्यास बोलावले अन्.. 

Chandrapur Crime : विकास राजुरकर - चंद्रपूरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका पाच वर्षीय चिमुरडीवर 65 वर्षीय रिटायर्ड वृद्धाने लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणात पीडित चिमुरडीने आईच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनं परिसर पूरता हादरून गेला आहे. 

हे ही वाचा : 4 वर्षीय चिमुकलीवर 62 वर्षीय वृद्धाकडून लैंगिक शोषण अन्..

5 वर्षीय पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 वर्षीय पीडित मुलगी आणि तिच्या 12 वर्षीय बहिणीच्या घरासमोरील पार्किंग परिसरात खेळत होती. त्यादरम्यान, 65 वर्षीय रिटायर्ड वृद्ध हा पत्नीसोबत कारमधून आले आणि ते घरी जाताना त्यांनी पीडितेला आवाज दिला. बिस्कीट पुडा देण्याच्या आमिषाने घरी बोलावले, पीडित बिस्कीट घेऊन ती पुन्हा आली आणि तिला खेळणाऱ्या मुलांना ती बिस्कीटं वाटली. 

आइसक्रीम खाण्यास बोलावले अन्.. 

शेजारी राहणाऱ्या वृद्ध व्यक्तीने घराच्या बाल्कनीतून पीडितेला आवाज दिला होता. तेव्हा तिला आइसक्रीम खाण्यास बोलावले. वृद्ध व्यक्ती मुलीला बेडरूममध्ये घेऊन गेला आणि तिची पँट उतरवून तिचे लैंगिक शोषण केले. नराधम वृद्धाने क्रूरतेच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. 

माणुसकीच्या नात्याला लाज आणणारा प्रकार उघडकीस आला होता. काही वेळानंतर बहीण अद्याप कशी आली नाही? असा पीडितेच्या बहिणीसमोर प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर तिने आपल्या बहिणीला आवाज दिला असता, पीडितेला घटनेची माहिती कुटुंबियांना सांगितली होती. पीडितेचं बोलणं ऐकून पीडितेच्या पायाखालची जमीन सरकून गेली. आईने तात्काळपणे पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.