भयंकर! महाराष्ट्रातील 25 तरुणांना ओलीस ठेवलं, म्यानमार-थायलंड सीमेवर काय घडलं?

मुंबई तक

Job Fraud : उच्च पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील 25 तरुणांना म्यानमार-थायलंड सीमेवरील 'गोल्डन ट्रँगल' परिसरात ओलिस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीडमधील एका तरुणाच्या फोनमुळे या आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी आणि सायबर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश झाला.

ADVERTISEMENT

Job Fraud News
Job Fraud News
google news

बातम्या हायलाइट

point

भयंकर! महाराष्ट्रातील 25 तरुणांना ओलीस ठेवलं

point

म्यानमार-थायलंड सीमेवर काय घडलं?

Job Fraud : बीड, उच्च पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील 25 तरुणांना म्यानमार-थायलंड सीमेवरील कुख्यात 'गोल्डन ट्रँगल' परिसरात ओलिस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. म्यानमार, थायलंड आणि लाओस या देशांच्या सीमा ज्या ठिकाणी एकत्र येतात, त्या परिसराला आंतरराष्ट्रीय स्तरावर 'गोल्डन ट्रँगल' म्हणून ओळखले जाते. या प्रकरणाची माहिती बीडमधील एका तरुणाच्या धक्कादायक फोनमुळे समोर आली असून, या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी आणि सायबर फसवणुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. नोकरीच्या नावाखाली परदेशात नेण्यात आलेल्या तरुणांना प्रत्यक्षात अमानुष छळाला सामोरे जावे लागत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

हेही वाचा : Personal Finance: महिनाअखेर पैसे कुठे जातात? मासिक बजेट बनवण्याच्या 5 सोप्या पद्धती जाणून घ्या

ऑनलाइन फसवणुकीचे काम करण्यास भाग पाडले

पीडित तरुणांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना बंदुकीचा धाक दाखवत दिवसाला तब्बल 18 ते 19 तास ऑनलाइन फसवणुकीचे काम करण्यास भाग पाडले जात आहे. हे काम करण्यास नकार दिल्यास त्यांच्यावर मारहाण केली जाते, विजेचे शॉक दिले जातात आणि विविध प्रकारचा अमानुष छळ केला जात असल्याचे गंभीर आरोप त्यांनी केले आहेत. उच्च पगार आणि चांगल्या नोकरीच्या आश्वासनावर विश्वास ठेवून परदेशात गेलेल्या या तरुणांना आता ओलिस ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

हेही वाचा : सिंधुदुर्ग : तरुण तुफान नाचला, स्विमिंग पूलमध्ये उंचावरुन उडी अन् सगळं संपलं VIDEO

हे वाचलं का?