सिंधुदुर्ग : तरुण तुफान नाचला, स्विमिंग पूलमध्ये उंचावरुन उडी अन् सगळं संपलं VIDEO
swimmiming pool death : मालवणमधील रिसॉर्टच्या स्विमिंग पूलमध्ये उंचावरून उडी मारताना इस्लामपूरच्या 25 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सिंधुदुर्ग : तरुण तुफान नाचला
स्विमिंग पूलमध्ये उंचावरुन उडी अन् सगळं संपलं VIDEO
swimmiming pool death : मालवण तालुक्यातील वायरी येथील मालवणी पाहुणचार रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूलमध्ये उंचावरून उडी मारल्याने एका 25 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. श्रेणीक मिलिंद टाकळे (वय 25, रा. ता. कागल, जि. कोल्हापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. स्विमिंग पूलमध्ये उंचावरून उडी मारल्यानंतर त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा : अहिल्यानगर : बायकोचे गावातल्या परपुरुषाशी अनैतिक संबंध, नवऱ्याचं भयंकर पाऊल
चार फूट खोल स्विमिंग पूलमध्ये उंचावरुन उडी
कागल येथील दहा मित्र पर्यटनासाठी मालवणमध्ये आले होते. त्यांनी वायरी येथील मालवणी पाहुणचार रिसॉर्टमध्ये मुक्काम केला होता. दुपारच्या सुमारास काही मित्र खोलीत होते, तर काही जण स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेत होते. यावेळी श्रेणीक टाकळे याने छोट्या स्विमिंग पूलमधील लहान मुलांसाठी असलेल्या सुमारे चार फूट खोल भागात आठ ते दहा फूट उंचीवरून उडी घेतली.
हेही वाचा : नवऱ्याकडून गर्भात वाढत असलेल्या बाळाची DNA चाचणीची मागणी, शेवटी भयंकर घडलं!









