नवऱ्याकडून गर्भात वाढत असलेल्या बाळाची DNA चाचणीची मागणी, शेवटी भयंकर घडलं!
Crime News : गर्भात वाढत असलेल्या बाळाची डीएनए चाचणी करण्याची मागणी केल्यानंतर गर्भवती महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हैदराबादजवळ उघड झाली. या प्रकरणी पोलिसांनी पती आणि सासूला अटक केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नवऱ्याकडून गर्भात वाढत असलेल्या बाळाची DNA चाचणीची मागणी
गर्भवती महिलेने थेट आत्महत्याच केली
Crime News : गर्भवती महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्भात वाढत असलेल्या बाळाची डीएनए चाचणी करण्याची पतीने मागणी केल्यानंतर झालेल्या मानसिक त्रासातून हा प्रकार घडल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेचा पती आणि सासूला अटक केली आहे. मृत महिलेचे नाव जी. सुष्मिता (वय 23) असे असून, ती पाच महिन्यांची गर्भवती होती. 24 जूनच्या संध्याकाळी मेदक जिल्ह्यातील अल्लादुर्ग मंडलातील गडीपेड्डापूर गावातील तिच्या घरी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.
हेही वाचा : "ऑपरेशन टायगर नाही, हे ऑपरेशन देवेंद्र.. पंतप्रधान पद", उद्धव ठाकरेंनी उडवून दिली मोठी खळबळ
पतीकडून शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचा आरोप
सुष्मिता ही विकाराबाद जिल्ह्यातील मोथकुपल्ली गावातील रहिवासी होती. सुमारे 18 महिन्यांपूर्वी तिचा विवाह गडीपेड्डापूर येथील बांगड्यांचा व्यवसाय करणाऱ्या जी. अभिलाष याच्याशी झाला होता. सुष्मिताच्या आई जी. जनाबाई यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत मुलीला पतीकडून शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 जून रोजी त्या आणि त्यांचे पती सुष्मिताच्या घरी डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाच्या तयारीबाबत चर्चा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी अभिलाष याने कार्यक्रमावरून वाद घालत गर्भात वाढत असलेल्या बाळाची डीएनए चाचणी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर समाजातील ज्येष्ठांनी हस्तक्षेप केल्यावर तेथील वाद शांत झाला आणि ते घरी परतले.
हेही वाचा : शिंदेंच्या आमदाराचा 'टक्केवारीचा' कथित Video प्रचंड व्हायरल, शिवसेना करणार कारवाई?









