डमी पुतळा, सियाला लोहगडावर आणलं, पोलिसांना काय तपासलं?
ketan agarwal murder case : केतन अग्रवाल हत्याप्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी लोहगड किल्ल्यावर सियाला घेऊन सीन रिक्रिएश केलाय. पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम समजून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात तांत्रिक आणि फॉरेन्सिक तपासही सुरू आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
डमी पुतळा, सियाला लोहगडावर आणलं
पोलिसांना काय तपासलं?
ketan agarwal murder case : पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासाला आता महत्त्वाचे वळण मिळाले असून, पुणे ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सीन रिक्रिएश केलाय. रविवारी सकाळी सुमारे साडेसहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी आरोपी सिया गोयल हिला लोहगड किल्ल्यावर नेले. 18 जून रोजी केतन अग्रवाल यांचा मृत्यू ज्या ठिकाणी झाला होता, त्याच ठिकाणी पोलिसांनी सीन रिक्रिएशन करून त्या दिवशी नेमके काय घडले, कोण कुठे उभे होते आणि केतन अग्रवाल दरीत कसे पडले, याचा कथित घटनाक्रम आरोपीकडून समजून घेण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा : दुकानदाराचा परफेक्ट प्लॅन, चार महिन्यात आठ जणांना संपवलं, नववी हत्या करतानाच...
पोलिसांच्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रक्रियेचा उद्देश आरोपींनी चौकशीदरम्यान दिलेल्या कथित जबाबांची घटनास्थळावरील परिस्थितीशी पडताळणी करणे हा आहे. आरोपींनी सांगितलेला घटनाक्रम प्रत्यक्ष घटनास्थळाशी जुळतो का, त्यांनी उल्लेख केलेल्या ठिकाणाहून एखाद्याला ढकलणे शक्य होते का आणि सर्व घटना त्यांनी सांगितलेल्या क्रमाने घडू शकल्या असत्या का, याची तपास यंत्रणा खातरजमा करत आहे. याचबरोबर मोबाईल फोन लोकेशन, कॉल डिटेल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज तसेच घटनेपूर्वी आणि नंतरच्या हालचालींचीही तपासणी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हत्येचा कथित कट नेमका कधी आणि कसा रचला गेला तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचाही तपास सुरू आहे.
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात विजांसह पाऊस घालणार धिंगाणा, 'या' जिल्ह्यांवर आस्मानी संकट









