Maharashtra Weather : मुंबईसह 'या' जिल्ह्यांत पाऊस धुमाकूळ घालणार तर..

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यभरात मान्सूनने हजेरी लावली असून पावसासाठी पोषक असं हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक भागांत पावसाची संतत धारा सुरू असून 27 जून रोजी अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली होती. अशातच 28 जून 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. 

ADVERTISEMENT

Maharashtra weather
Maharashtra weather
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यभरात पावसासाठी पोषक हवामान कायम

point

राज्यातील अनेक भागांत पावसाची संतत धारा

Maharashtra Weather : राज्यभरात मान्सूनने हजेरी लावली असून पावसासाठी पोषक असं हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक भागांत पावसाची संतत धारा सुरू असून 27 जून रोजी अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली होती. अशातच 28 जून 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. 

हे ही वाचा : "ऑपरेशन टायगर नाही, हे ऑपरेशन देवेंद्र.. पंतप्रधान पद", उद्धव ठाकरेंनी उडवून दिली मोठी खळबळ

कोकण 

कोकण विभागातील पालघर, ठाणे आणि मुंबई परिसरात विजांच्या कडकटासह पाऊस धिंगाणा घालणार आहे. तसेच वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मान्सूनचा अलर्ट जारी करण्यात आला. तसेच काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाची अधिकची शक्यता वर्तवली आहे. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना यलो अलर्टचा अंदाज जारी केला. याच भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम मान्सून दाखल होणार आहे. हिंगोली जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 

हे वाचलं का?