उल्हासनगर : एकाच दिवसात 8 जणांना सर्पदंश! पुढे काय घडलं?
snakebite patients : एकाच दिवसात आठ जणांना सर्पदंश झाल्याने खळबळ उडाली. मात्र उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांच्या तत्पर उपचारांमुळे सर्वांचे प्राण वाचले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
एकाच दिवसात 8 जणांना सर्पदंश झाल्याने उल्हासनगरमध्ये खळबळ
डॉक्टरांच्या तत्पर उपचारांमुळे सर्वांचे प्राण
snakebite patients : पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. एकाच दिवसात तब्बल आठ जणांना सर्पदंश झाल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांनी वेळेत उपचार करून सर्व आठ रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश मिळवले आहे. सर्पदंश झालेल्यांमध्ये चार वर्षांची एक चिमुकली, आठ वर्षांचा एक मुलगा, तीन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. या घटनेमुळे पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका वाढत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
हेही वाचा : शिंदेंच्या आमदाराचा 'टक्केवारीचा' कथित Video प्रचंड व्हायरल, शिवसेना करणार कारवाई?
सर्व रुग्णांची प्रकृती नियंत्रणात आणण्यात डॉक्टरांना यश
अंबरनाथ, उल्हासनगर, वांगणी, मुरबाड, टिटवाळा आणि कर्जत या भागांतील हे सर्व रुग्ण उपचारासाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी तातडीने प्रत्येक रुग्णाची तपासणी केली. सर्पदंशाचे स्वरूप लक्षात घेऊन आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे सर्व रुग्णांची प्रकृती नियंत्रणात आणण्यात डॉक्टरांना यश आले.
हेही वाचा : TET पेपर लीक प्रकरण : तिघांना अटक, मुख्य आरोपी फरार, 1.5 कोटींचा रेट









