मोठी बातमी: पुन्हा एकदा राजकीय भूकंप.. शिंदे काही थांबेनात, उद्धव ठाकरेंचा 'तो' आमदार फोडला अन् थेट...

मुंबई तक

Sachin ahir joins shinde shivsena : उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला असून विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. महायुतीकडून त्यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

ADVERTISEMENT

Sachin ahir joins shinde shivsena
Sachin ahir joins shinde shivsena
google news

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरेंना तगडा झटका, सचिन अहिर शिंदेसेनेत;

point

थेट उपसभापतीपदासाठी अर्ज भरला

Sachin ahir joins shinde shivsena : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला तगडा झटका बसलाय. विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला असून महायुतीच्या वतीने त्यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नुकतेच सहा खासदार फुटलेले असताना आता विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही साथ सोडल्याने ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय. 

शिंदेंच्या शिवसेनेतून पहिली प्रतिक्रिया 

याबाबत बोलताना संजय शिरसाठ म्हणाले, सचिन अहिर हा शिवसेनेचा आमदार होता. शिवसेनेमध्येच आलेला आहे. आजची जी घटना आहे. त्यातून आम्ही शिवसैनिकाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या मतदारसंघात इतरांनी केलेलं अतिक्रमण आणि त्याच्यावर झालेला अन्याय हा दूर करण्याता प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे. तो मूळ शिवसैनिक आहे. त्याला अपात्र करण्याचा प्रश्न येत नाही. तांत्रिक गोष्टींसाठी आम्ही कायदेशीर सल्ला घेतलेला आहे. ठाकरे आता सचिन अहिरांनाही गद्दार म्हणतील. 

हेही वाचा : केतन-सियाने प्रवास केला 'त्या' कारच्या ड्रायव्हरचा थरारक खुलासा

उपसभापतीपदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष

सचिन अहिर यांनी शिंदेसेनेकडून विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज भरत आपल्या नव्या राजकीय वाटचालीची अधिकृत घोषणा केली. महायुतीचे उमेदवार म्हणून ते या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे वाचलं का?