पुणे : 10 वर्षांची मुलगी मंदिरात दर्शनासाठी एकटीच आली, नराधमाला दिसली अन्

Pune Crime News : पुण्यातील निगडी परिसरातील मंदिरात प्रार्थना करणाऱ्या 10 वर्षांच्या मुलीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप. सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे पोलिसांनी विशाल सिंह याला अटक केली.

ADVERTISEMENT

Pune Crime News
Pune Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पुणे : 10 वर्षांची मुलगी मंदिरात दर्शनासाठी एकटीच आली,

point

नराधमाला दिसली अन् केलं गैरकृत्य

Pune Crime News : पुण्यातील एका मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेलेल्या 10 वर्षांच्या मुलीसोबत एका व्यक्तीने गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला असून, निगडी पोलिसांनी विशाल सिंह नावाच्या आरोपीला अटक केली आहे. निगडी परिसरातील एका मंदिरात ही घटना घडली. 10 वर्षांची मुलगी महादेवाची पूजा करून दर्शन घेत होती. ती मंदिरात एकटी असताना एका व्यक्तीने तिचे हात पकडून तिला जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला. मंदिरातील सीसीटीव्ही चित्रणात हा प्रकार कैद झाला आहे. चित्रणात मुलगी स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करताना दिसते. आरोपी तेथून निघून गेल्यानंतर घाबरलेली मुलगी रडू लागते. त्यानंतर ती पुन्हा हात जोडून प्रार्थना करताना दिसते. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा : सिंधुदुर्ग : महिला पोलिसाच्या मृत्यू प्रकरणात ट्वीस्ट, पोलीस पतीला अटक; नेमंक काय घडलं?

मुलीचा आवाज ऐकून आरोपी तेथून पळून गेला

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी मंदिरात प्रार्थना करण्यासाठी एकटीच गेली होती. त्याच वेळी विशाल सिंह हा मंदिराबाहेर असलेल्या टाकीतून पाणी घेण्यासाठी आला होता. मंदिरात मुलगी एकटी असल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर तो आत गेला. त्यानंतर त्याने मुलीच्या जवळ जाऊन तिला जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे मुलगी घाबरली आणि तिने आरडाओरडा सुरू केला. मुलीचा आवाज ऐकून आरोपी तेथून पळून गेला. घडलेल्या प्रकारानंतर मुलीने आपल्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत विशाल सिंह याला अटक केली.

आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील मजूर 

विशाल सिंह हा मेट्रोच्या कंत्राटदाराकडे मजूर म्हणून काम करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील असल्याचेही सांगण्यात आले आहे. मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेलेल्या लहान मुलीसोबत असा प्रकार घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या घटनेमुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. निगडी पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास केला जात आहे. तपासादरम्यान या प्रकरणातील पुढील तपशील समोर येण्याची अपेक्षा आहे.