जळगाव: 40 वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार, 14 जणांना अटक
Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील फतेहपूर ठाणे क्षेत्रातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 40 वर्षीय विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचाराची दुर्दैवी घटना समोर आली. ही घटना 2 जून 2026 रोजी घडली होती, या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महिलेच्या मैत्रिणीसमोर लैंगिक अत्याचार
14 जणांवर गुन्हा दाखल
Jalgaon crime : मनीष जोग - जळगाव जिल्ह्यातील फतेहपूर ठाणे क्षेत्रातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 40 वर्षीय विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचाराची दुर्दैवी घटना समोर आली. ही घटना 2 जून 2026 रोजी घडली होती. फतेहपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील देउलगाव-कापुसवाडी मार्गवर थंबरदा नाले परिसरात एका निर्जनस्थळी हा प्रकार घडला होता.
हे ही वाचा : नागपूर: नात्याला काळिमा! पित्यानं पोटच्या मुलीसोबत केले अश्लील कृत्य
महिलेच्या मैत्रिणीसमोर लैंगिक अत्याचार
पीडिता महिला आपल्या मैत्रिणींसोबत याच भागात गेली होती, त्यावेळी त्याच परिसरात काही लोकांनी त्यांना धमकावले. काही लोकांनी मैत्रिणींच्या समोरच महिलेवर जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार केला. घटनास्थळी असलेल्या काही तरुणांनी हा प्रकार मोबाईलमध्ये कैद केला. संबंधित प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
14 जणांवर गुन्हा दाखल
संबंधित व्हिडिओ समोर आल्यानंतर पीडितेनं तात्काळपणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळपणे कारवाई करत, एकूण 15 लोकांवर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी तपास करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. फतेहपूर पोलिसांनी 14 जणांवर गुन्हा दाखल केला, तसेच एकाचा शोध घेणं सुरू आहे.
हे ही वाचा : चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळलं, 10 विद्यार्थी जखमी, एकाचा अंत
या प्रकरणातील पुढील तक्रार फतेहपूर पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत. उप निरीक्षक पोलीस अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्यासाठी आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये या प्रकरणी दक्षता घेण्यास सांगितली. तसेच या प्रकरणी तक्रार करून समोरं जावं.









