नागपूर: नात्याला काळिमा! पित्यानं पोटच्या मुलीसोबत केले अश्लील कृत्य

योगेश पांडे

Nagpur crime : नागपूरच्या शांतिनगर पोलीस ठाणे परिसरात नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वडिलांनीच पोटच्या लेकीवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे. आरोपीचं वय 44 वर्षे आहे.

ADVERTISEMENT

Nagpur crime
Nagpur crime
Google CTA

बातम्या हायलाइट

point

वडिलांचीच पोटच्या मुलीवर वाईट नजर 

point

आरोपी विरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

Nagpur Crime : नागपूरच्या शांतिनगर पोलीस ठाणे परिसरात नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वडिलांनीच पोटच्या लेकीवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे. आरोपीचं वय 44 वर्षे आहे. आरोपी वडिलांवर मुलीवर लैंगिक अत्याचार आणि छेडछाड केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला, नंतर त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

हे ही वाचा : 24 वर्षीय तरुणीला मोमोजचं आमिष दाखवलं, धावत्या गाडीत नको तेच...

वडिलांचीच पोटच्या मुलीवर वाईट नजर 

पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, इयत्ता 10 वी मध्ये शिक्षण घेणारी पीडित विद्यार्थिनी आहे. आई जेव्हा घरात काम करायची किंवा पीडिता जेव्हा घरात एकटी असायची तेव्हा वडील मुलीसोबत वाईट कृत्य करायचे. या प्रकरणाबाबत कोणाला काही सांगितल्यास वाईट परिणाम भागावे लागतील अशी धमकी देखील दिली. 

आरोपी विरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

आरोपी वडिलांच्या भीतीने तरुणी रात्रभर शांतच होती. दुसऱ्या दिवशी सकाळी पीडितेनं आईजवळ घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर आई आणि मुलीने शांतिनगर पोलीस ठाणे गाठून या प्रकरणाची तक्रार दाखल केली. संबंधित प्रकरणात आरोपीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.  अशातच आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. 

हे ही वाचा : 'पीएम मोदी अन् त्यांचं मंत्रिमंडळ अवाक्षर...', राम मंदिरातील अपहारावरुन ठाकरेंची पोस्ट   

शांतिनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी गजानन तामठे यांनी आज तक या प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलं की, पीडितेनं तक्रार दाखल केल्यानंतर रविवारी रात्री पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. सोमवारी त्याला न्यायालयात सादर केले जाणार आहे.