चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळलं, 10 विद्यार्थी जखमी, एकाचा अंत
Mumbai News : मुंबईतील चेंबूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. 11 नंबर रोडवर भीषण अपघातात दुपारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसवर अचानकपणे झाड कोसळलं. या दुर्घटनेत 10 शाळकरी मुलं गंभीर जखमी झालीत, तसेच एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईतील चेंबूरमध्ये एक मोठी दुर्घटना
11 नंबर रोडवर भीषण अपघातात 10 शाळकरी मुलं गंभीर जखमी
Mumbai News : मुंबईतील चेंबूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. 11 नंबर रोडवर भीषण अपघातात दुपारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसवर अचानकपणे झाड कोसळलं. या दुर्घटनेत 10 शाळकरी मुलं गंभीर जखमी झालेत. या भीषण दुर्घटनेत एक विद्यार्थी बसमध्ये अडकला होता, त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्राथमिक तपासातून माहिती समोर आली की, या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही दुर्घटना दुपारी 2:50 वाजता घडल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा : नागपूर: नात्याला काळिमा! पित्यानं पोटच्या मुलीसोबत केले अश्लील कृत्य
शाळेच्या बसवर एक जुने झाड कोसळल्याची दुर्दैवी घटना
घडलेल्या घटनेनुसार, चेंबूर येथील 11 नंबर रोडवरून संबंधित खाजगी शाळेच्या बसवर एक जुने झाड कोसळल्याची दुर्दैवी घटना समोर आली. झाडाच्या मोठमोठ्या फांद्या थेट बसच्या छतावर कोसळल्याने बसचा समोरील भाग दबला गेला. या दुर्दैवी भीषण अपघातात एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाला. यानंतर विद्यार्थ्यांचा आक्रोश आणि किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या होत्या.
हे ही वाचा : 'मी पक्ष सोडलेला नाही...', सचिन अहिरांचा मोठा दावा.. बाजूलाच बसलेले शिंदे तात्काळ म्हणाले, अरे...!
या भीषण अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. इतर सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले होते. इतर चौघांवर सध्या झेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. जखमींना बसबाहेर काढण्यात आले होते.









