'मी पक्ष सोडलेला नाही...', सचिन अहिरांचा मोठा दावा.. बाजूलाच बसलेले शिंदे तात्काळ म्हणाले, अरे...!
Vidhan Parishad Deputy Chairman Election: सचिन अहिरांच्या एका वक्तव्याने राजकारणात नवा संभ्रम निर्माण झाला आहे. एकीकडे ते "मी पक्ष सोडलेला नाही" असे सांगत आहेत, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: शिवसेना UBT पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी सोमवारी (30 जून) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विधानपरिषद उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. या घडामोडीनंतर त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या. मात्र, पत्रकार परिषदेत सचिन अहिर यांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करत "मी अद्याप कुठलाही पक्ष सोडलेला नाही," असा स्पष्ट दावा केला. या वक्तव्यानंतर त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.
'मी पक्ष सोडलेला नाही'; सचिन अहिर नेमकं काय म्हणाले?
पत्रकार परिषदेत बोलताना सचिन अहिर यांनी पक्षांतराच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना म्हटले,
"एक लक्षात घ्या, मी पक्ष कुठलाही सोडला नाही. तो तांत्रिक मुद्दा आहे. त्याबद्दल आपण वेगळ्या व्यासपीठावर बोलू. उपसभापतीपदाची जबाबदारी शिंदे साहेबांनी माझ्यावर टाकली आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा हा बहुमान आहे. तो बहुमान जपत मी पुढे काम करेन."
या वक्तव्यातून त्यांनी सध्या तरी औपचारिक पक्षांतर झाल्याचे नाकारले. त्याचवेळी उपसभापतीपदासाठी मिळालेल्या संधीबद्दल एकनाथ शिंदे यांचे आभारही मानले.
हे ही वाचा>> चर्चा होती ठाकरेंच्या आणखी एका खासदाराची, पण फुटला भलताच नेता.. शिंदेंनी 'असा' दाखवला कात्रजचा घाट!
'बाळासाहेबांच्या विचारांनुसार शिंदे काम करत आहेत'; अहिरांचे शिंदेंबाबत कौतुक
सचिन अहिर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचेही कौतुक केले. ते म्हणाले,









