चर्चा होती ठाकरेंच्या आणखी एका खासदाराची, पण फुटला भलताच नेता.. शिंदेंनी 'असा' दाखवला कात्रजचा घाट!
Eknath Shinde's shock tactics: शिवसेना UBT पक्षातील आणखी एका खासदाराच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांनी राज्यातील राजकारण तापलेले असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी एक मोठा राजकीय डाव साधला आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: शिवसेना UBT पक्षाचे सहा खासदार फोडून एकनाथ शिंदेंनी नुकतंच 'ऑपरेशन टायगर' पार पाडलं होतं. यानंतर देखील ठाकरेंचा आणखी एक खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात उधाण आलं होतं. ठाकरेंकडे उरलेल्या तीन खासदारांपैकी आणखी कोणता खासदार फुटणार याकडे सगळ्यांचं लक्ष असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जबरदस्त धक्कातंत्राचा वापर केला. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना शिंदेंनी शिवसेना UBT चे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांना आपल्या पक्षात प्रवेश देत थेट विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी उमेदवारीही दिली.
शिंदेंच्या या नव्या खेळीमुळे ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून, शिंदे यांच्या 'धक्कातंत्राची' राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.
खासदार फुटीच्या चर्चांदरम्यान अनपेक्षित राजकीय घडामोड
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील एका खासदाराच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्या घडामोडीकडे लागले होते. मात्र, त्याच दरम्यान विधान परिषदेचे आमदार आणि ठाकरे गटातील महत्त्वाचे नेते सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश करत राजकीय समीकरणांनाच नवे वळण दिले. या घडामोडीमुळे ठाकरे गटाच्या संघटनात्मक ताकदीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हे ही वाचा>> अरुण गवळीचे भाचे सचिन अहिर कसे लागतात दिग्गज नेत्यांच्या गळाला?
Sachin Ahir Joins Shinde Sena: मुंबईतील प्रभावी चेहरा शिंदे गटात
सचिन अहिर हे मुंबईतील कामगार चळवळ, गिरणगाव आणि वरळी परिसरात प्रभाव असलेले नेते मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसमधून राजकारणाची सुरुवात करून त्यांनी तीन वेळा आमदारकी भूषवली. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि ठाकरे गटातील उपनेते म्हणूनही जबाबदारी सांभाळली.









