Maharashtra Weather : राज्यावर पावसाचं मोठं संकट, 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यात मान्सूनने हजेरी लावली असून काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवलेला आहे. तसेच काही ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे, अशातच जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज.

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
google news

बातम्या हायलाइट

point

ज्यात मान्सूनची हजेरी

point

'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

point

1 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Weather : राज्यात मान्सूनने हजेरी लावली असून काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवलेला आहे. तसेच काही ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. याचा काही विभागातील नागरिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घरातून बाहेर पडताना छत्री घेऊनच बाहेर पडावं. अशातच जाणून घ्या 1 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज. 

हे ही वाचा : चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळलं, 10 विद्यार्थी जखमी, एकाचा अंत

कोकण 

कोकण विभागात पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट वर्तवलेला आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि मुंबईमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकण विभागात पाऊस हाहाकार माजवण्याची शक्यता आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि नाशिक घाट परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. अहिल्यानगर या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. 

हे वाचलं का?