बीड : पतीच्या 'त्या' त्रासाला वैतागली, वायरने गळा आवळून खून, हार्ट अटॅकचा बनाव
Beed Crime News : पतीला 'हार्ट अटॅक' आल्याचा आणि ते हालचाल करत नसल्याचा बनाव रचत नातेवाईकांच्या मदतीने त्यांना रात्रीच शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, पोलिसांनी सगळा प्रकार उघडकीस आणला
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बीड : पतीच्या 'त्या' त्रासाला वैतागली
वायरने गळा आवळून खून, हार्ट अटॅकचा बनाव
बीड, रोहिदास हातागळे : अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा येथे कौटुंबिक वादातून पत्नीनेच पतीचा वायरने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दारुड्या पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून असहाय्य झालेल्या पत्नीने सुरुवातीला पतीला हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव रचला होता. मात्र, अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा खोटा बनाव उधळला गेला असून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : 'मी पक्ष सोडलेला नाही...', सचिन अहिरांचा मोठा दावा.. बाजूलाच बसलेले शिंदे तात्काळ म्हणाले, अरे...!
काळ्या वायरने शरीफ यांचा गळा आवळला, अन् ठार केलं
पाटोदा येथील रहिवासी शरीफ पठाण हे नेहमी दारू पिऊन घरी येऊन पत्नी नसरीन पठाण यांच्याशी वाद घालत असत. घटनेच्या रात्री देखील पती दारूच्या नशेत सतत त्रास देत असल्याने आणि घरात वाद विकोपाला गेल्याने, अत्यंत असहाय्य झालेल्या नसरीन यांनी रागाच्या भरात घरातील काळ्या वायरने शरीफ यांचा गळा आवळून त्यांना जीवे ठार मारले. या कृत्यानंतर त्यांनी घाबरून पतीला 'हार्ट अटॅक' आल्याचा आणि ते हालचाल करत नसल्याचा बनाव रचत नातेवाईकांच्या मदतीने त्यांना रात्रीच शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी शरीफ यांना मृत घोषित केल्यानंतर हा नैसर्गिक मृत्यू भासवण्याचा नसरीन यांचा प्रयत्न होता.









