Mumbai Tak Baithak 2026 Schedule: महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेने.. काय असणार विकासाचा अजेंडा? ‘मुंबई Tak बैठक’मध्ये दिग्गजांचं व्हिजन
Mumbai Tak Baithak: महाराष्ट्रातील राजकारण हे सध्या निर्णायक टप्प्यावर आलं आहे. असं असतानाच मुंबई Tak बैठकीत या सगळ्या आढावा घेतला जाणार आहे. राजकारणातील दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये बुधवारी (1 जुलै) ‘मुंबई Tak बैठक’ पार पडणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणावर 'मुंबई Tak बैठक'मध्ये मंथन
महाराष्ट्राच्या विकासाचा अजेंडा आणि राजकारण कसं असणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक दिग्गज होणार सहभागीमुंबई: महाराष्ट्रातील जवळपास सर्व निवडणुका संपल्या असल्या तरी राज्यातील राजकारणात उद्या काय घडेल याची कोणालाही शाश्वती नाही. त्यामुळे सध्या महाराष्ट्राचं राजकारण एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलं आ
मुंबई: महाराष्ट्रातील जवळपास सर्व निवडणुका संपल्या असल्या तरी राज्यातील राजकारणात उद्या काय घडेल याची कोणालाही शाश्वती नाही. त्यामुळे सध्या महाराष्ट्राचं राजकारण एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलं आहे. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर Mumbai Tak घेऊन येत आहे एक खास 'मुंबई Tak बैठक' (Mumbai Tak Baithak). या विशेष कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचे सध्याच्या राजकारणावरील व्हिजन आणि खास मुलाखती पाहायला मिळणार आहेत.
हा विशेष कार्यक्रम बुधवार, 1 जुलै रोजी मुंबईमध्ये पार पडणार असून सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत तो Mumbai Tak च्या YouTube चॅनलवर LIVE पाहता येणार आहे.
महाराष्ट्रातील दिग्गज नेते 'मुंबई Tak बैठक'मध्ये
सकाळी 11 वाजता पहिल्या सत्राची सुरुवात होईल. ज्याची सुरुवात काँग्रेसचे आमदार आणि नेते सतेज पाटील यांच्यापासून होणार आहे. त्यानंतर कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत दुसरं सत्र होईल.
तिसऱ्या सत्रात भाजपचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार आणि त्यांच्यासोबत काँग्रेसचे आमदार नाना पटोले हे असणार आहेत. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणावर हे दोन्ही दिग्गज नेते आपलं व्हिजन मांडतील.
श्रेयस तळपदे आणि जितेंद्र जोशी यांची रंगणार खास जुगलबंदी
मुंबई Tak बैठकीची ही जरी राजकीय नेत्यांच्या मुलाखतींनी होणार असली तरीही चौथं सत्र हे आपल्या मराठमोळ्या अभिनेत्यांच्या रंजक गप्पांनी होणार आहे. ‘मुबई Tak बैठक’मध्ये सिने क्षेत्रातील अभिनेते श्रेयस तळपदे आणि जितेंद्र जोशी हे सहभागी होतील.
आदित्य ठाकरे, रोहित पवार आणि सिद्धेश कदम मांडणार आपलं व्हिजन
पाचवं सत्र राज्यातील राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. या सत्रात शिवसेना UBT चे आमदार आदित्य ठाकरे सहभागी होणार असून पक्षातील घडामोडी, बंडाळी आणि भविष्यातील राजकीय दिशा यावर त्यांच्याशी सविस्तर संवाद होणार आहे.
सहाव्या सत्रात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार महाराष्ट्राच्या राजकारणासह त्यांच्या पक्षाच्या आगामी रणनीतीवर चर्चा करतील.
सातव्या सत्रात अंकशास्त्र अभ्यासक डॉ. नवनीत मानधनी अंकशास्त्राविषयी महत्त्वाची आणि रंजक माहिती प्रेक्षकांसमोर मांडतील.
आठव्या सत्रात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) चे अध्यक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) चे सचिव सिद्धेश कदम राज्यातील प्रदूषणाची सद्यस्थिती, पर्यावरण आणि उपाययोजनांवर आपलं मत मांडतील.
राजकारणावर राजदीप सरदेसाई, मिलिंद खांडेकर आणि गिरीश कुबेर यांची विशेष चर्चा
महाराष्ट्रातील वेगाने बदलणाऱ्या राजकारणाचा सखोल आढावा घेण्यासाठी नवव्या सत्रात इंडिया टुडेचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई, Tak चॅनल्सचे मॅनेजिंग एडिटर मिलिंद खांडेकर आणि लोकसत्ताचे मुख्य संपादक गिरीश कुबेर यांची विशेष चर्चा आयोजित करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मांडणार महाराष्ट्राचं व्हिजन
कार्यक्रमातील सर्वाधिक चर्चेची दोन्ही सत्रं म्हणजे दहावं आणि अकरावं सत्र असणार आहे.
- दहावं सत्र: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणाचा आलेख आणि आगामी दिशा मांडतील.
- अकरावं सत्र: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप आणि आपलं व्हिजन राज्यासमोर मांडतील.
'मुंबई Tak बैठक' LIVE कुठे पाहाल?
राजकारण, समाज, पर्यावरण, मनोरंजन आणि महाराष्ट्राच्या भविष्याचा वेध घेणारा 'मुंबई Tak बैठक' हा विशेष कार्यक्रम 1 जुलै रोजी सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत Mumbai Tak च्या YouTube चॅनलवर LIVE पाहता येणार आहे.
'मुंबई Tak बैठकी'चा हा भरगच्च कार्यक्रम अजिबात चुकवू नका.. पाहा फक्त मुंबई Tak!
