Mumbai Tak Baithak : 'एकही दिवस सरकारला झोपू दिलं नाही', फडणवीसांनी सांगितलं भाजप न फुटण्याचं टॉप सीक्रेट!

मुंबई तक

देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधी पक्षात होते, तेव्हा त्यांना आलेल्या अडचणींविषयी त्यांनी भाष्य केले. मात्र कितीही आव्हानं आली तरी आम्ही सरकारला एकही दिवस झोपू दिले नाही असं फडणवीस यांनी सांगितलं. ते नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

devendra fadnavis
devendra fadnavis
google news

बातम्या हायलाइट

point

Mumbai Tak Baithak : 'एकही दिवस सरकारला झोपू दिलं नाही'

point

फडणवीसांनी सांगितलं भाजप न फुटण्याचं टॉप सीक्रेट!

Devendra Fadnavis : ‘मुंबई तक’च्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. या विशेष कार्यक्रमात बोलताना त्यांनी 2019 ते 2022 या अडीच वर्षांच्या कालावधीत विरोधी पक्षात असताना केलेल्या कामाचा आणि संघर्षाचा पाढा वाचला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विरोधी पक्ष म्हणून काम करताना आलेल्या आव्हानांवर त्यांनी जाहीरपणे भाष्य केले. मात्र कितीही आव्हानं आली तरी आम्ही सरकारला एकही दिवस झोपू दिले नाही असं फडणवीस यांनी सांगितलं.

'सरकारला झोपू दिले नाही'

यावेळी फडणवीस म्हणाले की, आम्ही सलग अडीच वर्षे विरोधी पक्षात होतो. त्या काळात आमच्या लोकांना सोबत घेऊन आम्ही सातत्याने जनतेच्या प्रश्नांवर भांडत राहिलो. तत्कालीन सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्ष म्हणून आम्हाला अनेक प्रकारे त्रास देण्याचा आणि आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला; मात्र आम्ही कोणत्याही दबावाला किंवा त्रासाला मुळीच घाबरलो नाही. उलट आम्ही एकही दिवस सरकारला एकही दिवस झोपू दिले नाही, असा टोला त्यांनी लगावला.

'आमच्या पक्षाचा एकही आमदार फुटला नाही'

विरोधी पक्षात असताना लोकप्रतिनिधींना मिळणाऱ्या निधीबद्दल बोलताना त्यांनी अत्यंत महत्त्वाचा खुलासा केला. ते म्हणाले की, "अडीच वर्षांच्या त्या काळात आमच्या पक्षाचा एकही आमदार फुटला नाही, हे आमच्या एकजुटीचे मोठे यश होते. त्या संपूर्ण कार्यकाळात आम्हाला विकासकामांसाठी निधी म्हणून एकही पैसा मिळाला नाही. केवळ निधी म्हणजे फक्त पैसा नसतो, तर त्यात विविध प्रकल्प, पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर) आणि कार्यालयांचा समावेश असतो; मात्र नेहमीच सत्ताधारी पक्षातील आमदारांना अधिक निधी मिळावा असा प्रयत्न असतो.

पक्ष का बदलतात?

पक्षांतराच्या आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, "राजकारणात प्रत्येक जण आपले भविष्य पाहत असतो. ज्या नेत्याच्या किंवा पक्षाच्या नेतृत्वात आपण सध्या काम करत आहोत, ते नेतृत्व आपल्याला राजकीय भविष्य देऊ शकतात का, हा विचार प्रत्येक लोकप्रतिनिधी करत असतो आणि याच विचारपद्धतीतून अनेकदा पक्षांतराचे निर्णय घेतले जातात, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.
 

हे वाचलं का?