Mumbai Tak Baithak: '...तर दुधात साखरच!', पवारांच्या NCP विलिनीकरणाबाबत काँग्रेसच्या सतेज पाटलांचा मोठा दावा

मुंबई तक

"राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विलिनिकरणाचा निर्णय झाला, तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ते अत्यंत चांगलं ठरेल आणि हे विलिनीकरण म्हणजे दुधात साखर पडल्यासारखं असेल," असं स्पष्ट मत काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी मुंबई Tak बैठकमध्ये बोलताना व्यक्त केलं.

ADVERTISEMENT

mumbai tak baithak will there be a merger with the ncp satej patil makes a major claim what exactly did he say
'मुंबई Tak बैठक'मध्ये सतेज पाटील
Google CTA

Mumbai Tak Baithak Satej Patil: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. "हा निर्णय झाला, तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ते अत्यंत चांगलं ठरेल आणि हे विलिनीकरण म्हणजे दुधात साखर पडल्यासारखं असेल," असं स्पष्ट मत काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी व्यक्त केलं आहे. मुंबई Tak बैठक या विशेष कार्यक्रमात बोलताना त्यांनी राजकीय घडामोडींसह महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

पवारांच्या NCP चं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार का? पाहा सतेज पाटलांचा काय दावा

विलिनीकरणाविषयी बोलताना पुढे पाटील म्हणाले की, 'याआधी राष्टरवादी-काँग्रेस जी आघाडी झाली ती विचारधारेवर होती. त्यामुळे जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर दुधात साखरच आहे. मात्र या विलिनिकरणाविषयीच्या चर्चा दिल्ली स्तरावर होतात. आमचे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. जयंत पाटील, शशिकांत शिंदे यांच्याशी गप्पा मारताना या एकत्र लढूया असं आम्ही म्हणत असतो.'

हे ही वाचा>> 'पीएम मोदी अन् त्यांचं मंत्रिमंडळ अवाक्षर...', राम मंदिरातील अपहारावरुन ठाकरेंची पोस्ट

निधीसाठी संघर्ष

या बैठकीत सतेज पाटील यांनी निधी वाटपातील पक्षपातीपणा, विरोधकांची भूमिका, भाजपची सद्यस्थिती आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले. गेल्या 10-15 वर्षांत राज्यातील निधी वाटपाचा ट्रेंड बदलल्याचा आरोप करत ते म्हणाले की, जिल्ह्याला लोकसंख्येच्या निकषानुसार निधी मिळतो, मात्र सध्या विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना त्यांच्या हक्काचा आमदार फंड मिळवण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. आता प्रशासनसुद्धा चुकीच्या पद्धतीने वागत असून, किमान एक कोटी रुपयांमधील 50 लाख रुपये तरी आमदारांना मिळायला हवेत, अशी मागणी त्यांनी केली.

हे ही वाचा>> "ऑपरेशन टायगर नाही, हे ऑपरेशन देवेंद्र.. पंतप्रधान पद", उद्धव ठाकरेंनी उडवून दिली मोठी खळबळ

मविआने कणखर भूमिका घेतली

विरोधी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना सतेज पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी एकत्रितपणे सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात संघर्ष करत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन असो की विधीमंडळातील आवाज, मविआचे तिन्ही पक्ष एकत्र आहेत. विधीमंडळात विरोधकांना बोलू दिले पाहिजे आणि आमच्या किमान दोन लक्षवेधी सूचना तरी पटलावर आल्या पाहिजेत, असा आमचा प्रयत्न असतो. उद्धव ठाकरे प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्रस्त असतानाही जनतेसाठी दौरे करत आहेत. जनता सध्याच्या महायुती सरकारवर प्रचंड नाराज असून, मविआ हाच जनतेला सक्षम पर्याय देत आहे. शक्तीपीठ महामार्ग, वाढती महागाई आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प (SRA) यांसारख्या सरकारच्या धोरणांवर मविआने सातत्याने कणखर विरोधी भूमिका घेतली आहे.