धनजंय मुंडेंचं थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, नेमकं कारण काय?

मुंबई तक

Dhananjay munde letter to CM Devendra Fadnavis : नोकरीच्या आमिषाने म्यानमारमध्ये ओलिस ठेवलेल्या बीड जिल्ह्यातील तरुणासह महाराष्ट्रातील तरुणांची सुटका करा - धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ADVERTISEMENT

Dhananjay munde letter to CM Devendra Fadnavis
Dhananjay munde letter to CM Devendra Fadnavis
google news

बातम्या हायलाइट

point

धनजंय मुंडेंचं थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र

point

म्यानमारमध्ये ओलिस ठेवलेल्या महाराष्ट्रातील तरुणांची सुटका करण्याची मागणी

Dhananjay munde letter to CM Devendra Fadnavis, बीड : मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून म्यानमारमध्ये ओलिस ठेवण्यात आलेल्या बीड जिल्ह्यातील एका तरुणासह महाराष्ट्रातील इतर तरुणांची तातडीने सुरक्षित सुटका करण्यात यावी, अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. केंद्र सरकारच्या मदतीने या सर्व तरुणांना मायदेशी सुखरूप परत आणण्यासाठी तातडीने आवश्यक पावले उचलावीत, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात मोठ्या पगाराचे आमिष दाखवून तरुणांना परदेशात पाठवले जात असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. धनंजय मुंडे यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय? ते सविस्तर जाणून घेऊयात...

हेही वाचा : 'सकाळी मला मेसेज पाठवला...', विश्वासू सहकाऱ्याने साथ सोडल्यानंतर आदित्य ठाकरे काय म्हणाले?

धनजंय मुंडे यांचं पत्र जसंच्या तसं 

उपरोक्त विषयान्वये मी आपले लक्ष एका अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकाराकडे वेधू इच्छितो. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील नांदूरघाट येथील स्वप्नील काळुंके या तरुणासह महाराष्ट्रातील नाशिक, धाराशिव, चाळीसगाव आणि ठाणे येथील अनेक तरुणांना बँकॉकमध्ये नोकरीचे आमिष दाखवून म्यानमार सीमेवर ओलीस ठेवण्यात आले आहे.

सोशल मीडियावरील दरमहा ७० हजार रुपयांच्या नोकरीच्या जाहिरातीला भुलून हे तरुण तिथे गेले होते. मात्र, त्यांना थायलंड-म्यानमार सीमेवरील जंगलात (तथाकथित आयटी पार्क) नेऊन आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांच्या रॅकेटमध्ये अडकवण्यात आले आहे. तिथे या तरुणांकडून जबरदस्तीने १६ ते १८ तास सायबर फसवणुकीचे काम करवून घेतले जात आहे. नकार दिल्यास त्यांना अमानुष मारहाण करणे आणि इलेक्ट्रिक करंटचे झटके देणे असे भयंकर प्रकार घडत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तिथे सुमारे ७०० ते ८०० भारतीय तरुण अडकले असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील २० ते २५ तरुणांचा समावेश आहे.

हे वाचलं का?