ईडी-सीबीआयमुळे लोकं येतात, तर मग संजय राऊतांचा प्रवेश का होत नाही? सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य
Sudhir Mungantiwar on sanjay raut : "ईडी-सीबीआयमुळे लोकं येतात, तर मग संजय राऊतांचा प्रवेश का होत नाही?", असा सवाल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय. ते मुंबई Tak बैठकमध्ये बोलत होते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ईडी-सीबीआयमुळे लोकं येतात, तर मग संजय राऊतांचा प्रवेश का होत नाही?
सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य
Sudhir Mungantiwar on sanjay raut, मुंबई Tak बैठक : राज्यात सुरु असलेलं पक्षांतर आणि फोडाफोडीच्या राजकारणावर काँग्रेस नेते नाना पटोले आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी मुंबई Tak च्या बैठकीत समोर-समोर चर्चा केली. यावेळी नाना पटोले यांनी सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केली. तर दुसरीकडे सुधीर मुनगंटीवर यांनी प्रत्युत्तर दिले. दरम्यान, पक्षांतराच्या मुद्द्यावरुन सुधीर मुनगंटीवार यांनी एक प्रकारे संजय राऊत यांचं कौतुक केलं. ते नेमकं काय म्हणाले? जाणून घेऊयात...
"ईडी आणि सीबीआयमुळे माणसं आमच्याकडे येतात. तर मग संजय राऊत आमच्या पक्षात प्रवेश का करत नाहीत? शिवाय, राहुल गांधी आमच्या पक्षात का येत नाहीत?", असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.
सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले, आज आर.आर.पाटलांची आठवण होते. त्यांच्याबद्दल मला फार आदर आहे. ते मला घरी जेवायला बोलवायचे. मला राष्ट्रवादीत येण्याची ऑफर देऊन मंत्री करतो म्हणायचे. मात्र, मी माझ्या भूमिकेवर ठाम राहिलो. लोकं पक्ष का बदलतात? याची काही कारणं आहेत. प्रत्येकाला वाटतं आपल्या मतदारसंघाचा विकास 5 वर्षात झाला पाहिजे. तुम्ही (काँग्रेस) आत्तापर्यंत लोकं फोडले तर ते ईश्वरी कार्य होतं आता आम्ही केलं तर लोकशाहीवरुन प्रश्न विचारला जातो.
निधी मिळत नाही, खासदारांचा आरोप; मुनगंटीवार यांचं प्रत्युत्तर
पुढे बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, निधी मिळत नाही हा आरोप तर्कहीन आहे. लाडकी बहीण योजना काँग्रेस आमदाराच्या मतदारसंघात सुरु नाही का? कर्जमुक्ती काँग्रेस आमदाराच्या मतदारसंघात होणार नाही का? निधीबाबत भेदभाव केला जात नाही. पक्ष सोडताना त्यांना काहीतरी कारण द्यावं लागत असतं. ठाकरेंचं सरकार असताना त्यांच्याच आमदारांना उद्धव ठाकरे भेटत नव्हते. त्यांना निधी नव्हते. त्यामुळे 50 आमदार सोडून गेले.









