Mumbai Tak Baithak: 'तू ये इकडे.. तुला मंत्री बनवतो..', कोणत्या NCP नेत्याने दिलेली मुनगंटीवारांना ऑफर?
मुंबई Tak बैठक : "आर. आर पाटील गृहमंत्री असताना मला त्यांनी पक्षात येण्यास सांगितलं होतं. मला ते सारखे घरी जेवण करण्यासाठी बोलवायचे, त्याची आणि माझी चांगली मैत्री होती. त्यांनी मला ऑफर दिली की, जर पक्षात आला तर लगेच कॅबिनेट मंत्री पद देईल," असं मुनगुंटीवार म्हणाले होते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सुधीन मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले?
पक्षफुटीवर नाना पटोले काय म्हणाले?
मुंबई Tak बैठक : "आर. आर पाटील असताना मला त्यांनी पक्षात येण्यास सांगितलं होतं. मला ते सारखे घरी जेवण करण्यासाठी बोलवायचे, त्यांची आणि माझी चांगली मैत्री होती. त्यांनी मला ऑफर दिली की, जर पक्षात आला तर लगेच कॅबिनेट मंत्री पद देईल," असं ते म्हणाले होते. मी पक्षात प्रवेश केला नाही, असं भाजप नेते सुधीर मुनगुंटीवार यांनी मुंबई तक बैठक या कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान बोलले.
हे ही वाचा : Mumbai Tak Baithak: '...तर दुधात साखरच!', पवारांच्या NCP विलिनीकरणाबाबत काँग्रेसच्या सतेज पाटलांचा मोठा दावा
सुधीर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले?
मुंबई तक बैठक या कार्यक्रमात बोलताना, सुधीर मुनगुंटीवार यांनी राष्ट्रवादी दिवंगत नेते आर. आर पाटील यांच्याबाबत मोठं भाष्य केलं. ते म्हणाले की, "आर. आर पाटील हे माझे चांगले मित्र होते, ते मला त्यांच्या घरी जेवणासाठी बोलावयचे. तुला कॅबिनेट मंत्रीपद देतो असं सांगितलं होतं, फक्त पक्ष प्रवेश कर अशी मला ऑफर दिली होती. मात्र, मी पक्षात गेलो नाही," असं सुधीर मुनगुंटीवार म्हणाले होते.
पक्ष फुटीवरून मुनगुंटीवार काय म्हणाले?
नंतर सुधीर मुनगुंटीवार यांना पक्षफुटीबाबत विचारले असता ते म्हणाले की, "जेव्हा आमदार निवडून आल्यानंतर मी शपथ घेतो त्यानुसार; काम करतो. जनतेचे प्रश्न मांडणं माझी जबाबदारी आहे. पक्ष फुटीचं म्हणायचं तर हरियाणातूनच आयाराम आणि गयाराम हा शब्द आलेला आहे," असं ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, "बाबासाहेबांचा पराभव करताना निष्ठावंतांना कसं फोडलं? हा प्रश्न आजचा नाही, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.









