2 खासदारांना भाजपमध्ये यायचं होतं, पण फडणवीसांनी रोखलं, CM साहेबांनीच सांगितली सगळी Inside स्टोरी!
ठाकरे गटातील 6 खासदारांपैकी 2 जणांना भाजपमध्ये यायचं होतं. पण त्यांना त्याऐवजी शिंदेंच्या शिवसेनेतच का पाठविण्यात आलं याबाबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई Tak बैठक कार्यक्रमात मोठा खुलासा केला.
ADVERTISEMENT

मुंबई: ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिवसेना UBT पक्षाला जय महाराष्ट्र करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. पण या सर्व खासदारांनी थेट भाजपमध्ये प्रवेश न करता शिंदे यांच्या शिवसेनेची वाट का धरली? असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून उपस्थित केला जात होता. आता याच प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे.
ठाकरेंच्या दोन खासदारांना यायचं होतं भाजपमध्ये
'मुंबई Tak बैठक' या विशेष कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले, "आमचं दार बंद होतं. कोणासाठीही भाजपचं दार उघडलं नव्हतं. जे सहा खासदार आता शिंदेंकडे आले, ते मूळचे शिवसेनेतूनच निवडून आले होते. त्यामुळे त्यांनी शिवसेनेतच जावं, अशी आमची भूमिका होती. त्यांना भाजपमध्ये आणण्यासाठी आम्ही कोणताही प्रयत्न केला नाही."
यावेळी त्यांनी आणखी एक महत्त्वाचा खुलासा केला. "या सहा खासदारांपैकी एक-दोन खासदारांची भाजपमध्ये येण्याची इच्छा होती. मात्र, आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की, सध्या भाजपमध्ये प्रवेशाची व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला," असं फडणवीस म्हणाले.
ठाकरे गटाला मोठा धक्का
लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला चांगलं यश मिळालं असलं तरी त्यानंतर पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली. अखेर ठाकरे गटातील सहा खासदारांनी पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत वेगळी वाट स्वीकारली. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला मोठा धक्का बसला आहे.









