"भाजपचं दार बंदच, ज्यांना जायचं त्यांनी..."; देवेंद्र फडणवीसांनी पक्षफुटीवर केलं भाष्य

मुंबई तक

"भाजपचं दार बंदच होतं, त्यांना जायचं होतं तर त्यांनी शिवसेनेसोबतच जावं, कारण शिवसेना हा त्यांचा पक्ष आहे. अशा प्रकारचे ऑपरेशन होतात, त्यात नेमकं काय घडलं? कोणी केलं? का केलं? याबाबत सांगायचं नसतं. मित्रपक्षाला जे शक्य आहे ते आम्ही त्यांना मदत केली," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई तक बैठक या कार्यक्रमात बोलताना सांगितलं.

ADVERTISEMENT

Devendra fadnavis
Devendra fadnavis
google news

बातम्या हायलाइट

point

"भाजपचं दार बंदच"

point

पक्षफुटीनंतर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मुंबई तक बैठक : "भाजपचं दार बंदच होतं, त्यांना जायचं होतं तर त्यांनी शिवसेनेसोबतच जावं, कारण शिवसेना हा त्यांचा पक्ष आहे. अशा प्रकारचे ऑपरेशन होतात, त्यात नेमकं काय घडलं? कोणी केलं? का केलं? याबाबत सांगायचं नसतं. मित्रपक्षाला जे शक्य आहे ते आम्ही त्यांना मदत केली," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई तक बैठक या कार्यक्रमात बोलताना सांगितलं.   

हे ही वाचा : मुंबई Tak बैठक : शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचं काय होणार?, भुजबळ म्हणतात..

"विरोधी पक्ष म्हणून आम्हाला मोठा त्रास देण्यात आला"

"अडीच वर्षे सातत्याने मी आमच्या लोकांना घेऊन भांडत राहिलो, विरोधी पक्ष म्हणून आम्हाला मोठा त्रास देण्यात आला, पण, आम्ही सरकारला घाबरलो नाही. जे सोबत होते त्यांना वाटलं की, जी व्यक्ती आमच्या सोबत आहे त्याच्यासोबत आमचे भविष्य अंधारात जाणार नाही. मात्र जेव्हा असं वाटतं की इथं राहून भविष्य अंधारात जाणार तेव्हा पक्ष फुटतो."

"ज्यांनी योग्य वेळी माझी साथ सोडली त्यांना मी का मदत करू?"

"मी अनेकदा काही लोकांना निधी दिला होता, बाकीच्यांनी आम्ही विरोधात असताना दिला नाही. तेव्हा आमचे आमदार फुटले नाहीत," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव घेत मिश्कील टोला लगावला की, "ज्यांनी योग्य वेळी माझी साथ सोडली त्यांना मी का मदत करू? पॉलिटिकल सर्व्हायव्हची मला गरज नाही.  हे राजकारण आहे, प्रत्येकाला वाटतं की मला देखील संधी मिळावी, त्यात वाईट काय", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.  

हे ही वाचा : Mumbai Tak Baithak: 'तू ये इकडे.. तुला मंत्री बनवतो..', कोणत्या NCP नेत्याने दिलेली मुनगंटीवारांना ऑफर?

2019 मध्ये उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि शरद पवार यांनी मिळून महाविकास आघाडी निर्माण करून सत्ता स्थापन केली होती, त्यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. फडणीस म्हणाले, "मला जेव्हा प्रेम हवं होतं तेव्हा दिलं नाही, प्रेमभंग झाल्यानंतर त्या प्रेमाचा काय उपयोग?  नंतर ते म्हणाले की, "उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांनी पक्ष हातात घेतला. तेव्हा लोकांनी मुलायम यांच्यापासून अखिलेश यादव यांना साथ दिली. आमचं दार बंदच होतं, त्यांना जायचं होतं तर त्यांनी शिवसेनेसोबतच जावं", असं देवेंद्र फडणीस म्हणाले. 

हे वाचलं का?