केतन अग्रवाल हत्या प्रकरण : नवीन सेलफोन, सांकेतिक भाषा; कोर्टात सुनावणी कशी फिरली?

ओमकार वाबळे

सिया गोयल आणि चेतन चौधरी प्रकरणाची महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयाने पोलिसांची 3 दिवसांची वाढीव पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावली. दोन्ही आरोपींची थेट 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

ADVERTISEMENT

Chetan Agarwal Murder Case
Chetan Agarwal Murder Case
Google CTA

बातम्या हायलाइट

point

केतन अग्रवाल हत्या प्रकरण

point

नवीन सेलफोन, सांकेतिक भाषा

point

कोर्टात सुनावणी कशी फिरली?

Chetan Agarwal Murder Case : पुण्यातील मावळ तालुक्यातील वडगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात सिया गोयल आणि चेतन चौधरी प्रकरणाची महत्त्वाची सुनावणी पार पडली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी विभूते यांच्यासमोर झालेल्या या सुनावणीत न्यायालयाने पोलिसांची 3 दिवसांची वाढीव पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावत, दोन्ही आरोपींची थेट 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. यामुळे या दोन्ही आरोपींना आता पुण्याच्या येरवडा जेलमध्ये जावे लागणार असून, न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे त्यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोडवर्डमधून संवाद

न्यायालयात झालेल्या युक्तिवादादरम्यान सरकारी वकील राजश्री विरकुट आणि तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी कोर्टाला सांगितले की, पोलिसांनी सिया गोयलच्या घरातून आणखी एक नवीन मोबाईल फोन जप्त केला आहे. यापूर्वी जप्त केलेल्या फोनच्या फॉरेन्सिक अहवालातून असे समोर आले आहे की, सिया आणि चेतन हे दोघे आपापसात संवाद साधताना काही विशिष्ट 'कोडवर्ड' वापरत होते. हे कोडवर्ड कोणत्या व्यक्तीसाठी, घटनेसाठी किंवा कटासाठी वापरले गेले, हे शोधणे अत्यंत आवश्यक आहे. जर या दोघांची स्वतंत्र चौकशी केली, तर दोघेही या कोडवर्डचा वेगवेगळा अर्थ सांगून पोलिसांची दिशाभूल करू शकतात. त्यामुळे दोघांना समोरासमोर बसवून या कोडवर्डचा छडा लावण्यासाठी आणि नवीन फोनमधील डेटा विश्लेषणासाठी आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद पोलिसांनी केला.

बीड कनेक्शन समोर

याशिवाय, पोलिसांनी 31 मे ते 18 जून दरम्यानच्या 19 दिवसांच्या गुन्ह्याच्या घटनाक्रमाचा उल्लेख केला. 31 मे रोजी जेव्हा सिया पहिल्यांदा किल्ल्यावर गेली, तेव्हाच तिच्या डोक्यात हा कट शिजत होता, असा पोलिसांचा संशय आहे. 4 जून रोजी तिने तो अंमलात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु 6 जून रोजी तिच्या घरच्यांनी तिला बाली (इंडोनेशिया) ट्रिपचे नियोजन असल्यामुळे लोणावळ्याला जाण्याची परवानगी दिली नव्हती. हा बालीचा प्लॅन कॅन्सल होण्यामागे आणि या संपूर्ण कटामागे सियाच्या 'पासपोर्ट'चा मोठा संबंध आहे. तपासामध्ये सियाने आधी सांगितले होते की, तिने पासपोर्टची पाने फाडून ती फ्लश करून टाकली. मात्र, हा पासपोर्ट अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या प्रकरणात कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा (Eye Witness) नसल्यामुळे संपूर्ण केस ही परिस्थितीजन्य पुराव्यांवर अवलंबून आहे आणि म्हणूनच 6 जूनची तारीख आणि तो पासपोर्ट शोधणे पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या गुन्ह्याच्या कॉन्सपिरसीमध्ये (कटामध्ये) बीड कनेक्शन असलेला एक तिसरा माणूसही सामील असल्याचे समोर येत असून, कोडवर्ड उलगडल्यानंतर या तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग स्पष्ट होईल, असा दावा पोलिसांनी केला.

हे ही वाचा : 'नवऱ्याला मारेल त्याला एक लाख देईन..' बायकोचं चॅलेंज अन् घडलं भयंकर!

आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद

दुसऱ्या बाजूला, आरोपींच्या वकिलांनी पोलिसांच्या या मागणीला तीव्र विरोध दर्शवला. चेतन चौधरीचे वकील राधिकेश उत्तेवार यांनी आक्षेप घेतला की, पोलीस कोठडी वाढवून घेण्यासाठी पोलीस जुनेच मुद्दे पुन्हा पुन्हा मांडत आहेत. तपासात कोणतीही नवीन मोठी प्रगती झालेली नाही आणि आरोपी पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहेत, त्यामुळे कोठडी वाढवण्याची गरज नाही.

हे वाचलं का?