वाशिम : 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा, न्यायालयाचा मोठा निर्णय; नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

washim custodial death case : वाशिममधील 15 वर्षांपूर्वीच्या पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने 9 पोलीस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या निकालामुळे पोलिस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

वाशिम : 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा

point

न्यायालयाचा मोठा निर्णय; नेमकं प्रकरण काय?

Washim custodial death case, जका खान : वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने तब्बल 15 वर्षांपासून सुरू असलेल्या पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणाचा निकाल देत तत्कालीन 9 पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे वाशिम पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. शिक्षा झालेल्यांमध्ये तत्कालीन रिसोड पोलिस ठाण्याचे ठाणेदार महादेव माणिक धांडे यांच्यासह अन्य आठ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या नऊ आरोपींपैकी दोन पोलिस कर्मचारी निवृत्त झाले असून त्यामध्ये तत्कालीन ठाणेदारांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 10 मे रोजी रिसोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पारधी समाजातील बेग्या पवार यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मृताच्या आई-वडिलांनी रिसोड पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ज्या ठाणेदाराचे नाव तक्रारीत होते, त्यांनीच तक्रार स्वीकारण्यास नकार दिला होता. प्रकरण पोलिस कोठडीतील मृत्यूचे असल्याने आणि मृत व्यक्ती पारधी समाजातील असल्याने तक्रार नोंदवून घेण्यासाठी विविध स्तरावर आंदोलने आणि मोर्चेही काढण्यात आले होते. मृतदेहाच्या वैद्यकीय तपासणीत शरीरातील अनेक हाडे तुटल्याचे समोर आले होते.

बेग्या पवार यांच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याची माहिती 

या प्रकरणाचा तपास सीआयडीचे अधिकारी अन्वर शेख यांच्याकडे सोपविण्यात आला होता. त्यांनी प्रकरणातील प्रत्येक बाबीची सखोल चौकशी करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या तपासात बेग्या पवार यांना पोलिस ठाण्यात निर्दयपणे मारहाण करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला होता. विशेष म्हणजे, रात्री तीन वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी बेग्या पवार यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलिस ठाण्यात त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली आणि त्यांचा तात्काळ मृत्यू झाल्याचे प्रकरणात नमूद करण्यात आले. तसेच बेग्या पवार यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याची बाबही समोर आली आहे.

या प्रकरणाची सुनावणी तब्बल 15 वर्षे न्यायालयात सुरू होती. अखेर वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल देत तत्कालीन ठाणेदार महादेव माणिक धांडे आणि त्यांच्या आठ सहकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मुलाच्या मृत्यूप्रकरणी आरोपींना शिक्षा झाल्यानंतर बेग्या पवार यांच्या आई-वडिलांनी न्यायव्यवस्थेचे तसेच या प्रकरणाचा तपास करणारे सीआयडी अधिकारी अन्वर शेख यांचे आभार मानले. शिक्षा झालेल्या सर्व आरोपींना वाशिम कारागृहात पाठविण्यात आले असून कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना उद्या अमरावती कारागृहात हलविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

हे वाचलं का?