मोठी बातमी : ठाकरे रस्त्यावर उतरणार, भाजपला भिडणार.. नेमकं काय आहे ठाकरेंच्या शिवसेनेचं रामरक्षा आंदोलन?
राम मंदिरातील चोरीविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एल्गार पुकारला आहे. 5 जून रोजी संध्याकाळी चार वाजता मुंबईतील दादरमध्ये रामरक्षा आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. हे आंदोलन नेमकं कसं असेल, जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ठाकरे रस्त्यावर उतरणार, भाजपला भिडणार..
नेमकं काय आहे ठाकरेंच्या शिवसेनेचं रामरक्षा आंदोलन?
Uddhav Thackeray On Ramraksha Movement : राम मंदिरातील चोरीविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एल्गार पुकारला आहे. 5 जून रोजी संध्याकाळी चार वाजता मुंबईतील दादरमध्ये रामरक्षा आंदोलन करणार असल्याची घोषणा ठाकरेंनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कबूतरखान्याजवळील मारुतीच्या मंदिराजवळ हे आंदोलन होणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले की, 'आता हिंदू जागे झाले आहेत. ते जाब विचारतील. तो जाब विचारण्यासाठी आम्ही तिथे रामरक्षा म्हणून, हनुमान स्तोत्र म्हणू आणि हनुमान चालीसा म्हणू.'
'असं असेल आंदोलन'
हे आंदोलन राज्यभरातही करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, '5 तारखेचा कार्यक्रम ही सुरुवात आहे. त्यानंतर राज्यभर जिल्हा पातळीवर, शहरात, जिथे राम मंदिर असेल, हनुमान मंदिर असेल तिथे तिथे हे आंदोलन होईल. आता वारी सुरु होतीये. अगदी वारकरी सुद्धा ज्यांच्या मनात राम मंदिराच्या लुटीविरोधात आग आहे, ते सगळे एकत्र मिळून भारतीय जनता पार्टीला उत्तरदायित्व स्वीकारायला लावल्याशिवाय राहणार नाही.'
हे ही वाचा : 'तुम्ही पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांचे गुलाम नाहीत, जनतेचे सेवक आहात' हायकोर्टाने पोलिसांना फटकारले
राम मंदिरावर दरोडा
राम मंदिरातील लुटीविषयी बोलताना ठाकरे म्हणाले की, 'राम मंदिरावर दरोडा टाकला जातोय. टाकला गेलाय. त्याविरोधात पुरावे सुद्धा दिले गेले आहेत. काही जणांचं म्हणणं असंय की त्या चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय. हे फार गंभीर आहे.'










