अबब..! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या जळगावातील घरात 1.5 कोटींची रोकड, अर्धा किलो सोने...मोठं घबाड

मुंबई तक

akola stamp deputy collector kiran chaudhari Jalgaon house acb raid : अकोल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या जळगावातील घरावर एसीबीची 10 तास झडती; दीड कोटींहून अधिक रोकड, अर्धा किलो सोने आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त.

ADVERTISEMENT

akola stamp deputy collector
akola stamp deputy collector
Google CTA

बातम्या हायलाइट

point

अबब..! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या जळगावातील घरात 1.5 कोटींची रोकड,

point

अर्धा किलो सोने...मोठं घबाड, लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई

akola stamp deputy collector kiran chaudhari Jalgaon house acb raid : अकोल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या जळगाव येथील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या झडतीत तब्बल 1 कोटी 53 लाख 630 रुपयांची रोकड, अर्धा किलो सोने आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अकोल्यातील कारवाईनंतर किरण चौधरी यांचे जळगाव येथील घर सीलबंद करण्यात आले होते. त्यानंतर या घरात एसीबीच्या पथकाने झडती घेतली. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर रोकड, सोने आणि कागदपत्रे हाती लागल्याने या प्रकरणाची चर्चा अधिकच वाढली आहे.

हेही वाचा : Bishnoi Gang कडून आमदाराला धमक्या, पटोले अन् वडेट्टीवारांनी विधानसभेत आवाज चढवला

10 तास झडतीची कारवाई, महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात

जळगाव येथील या निवासस्थानी दुपारी 4 वाजल्यापासून मध्यरात्री 1 वाजेपर्यंत जवळपास 10 तास झडतीची कारवाई सुरू होती. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी घरातील प्रत्येक भागाची तपासणी करत रोकड, अर्धा किलो सोने तसेच महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली. या संपूर्ण कारवाईदरम्यान पंच उपस्थित होते. झडतीदरम्यान मिळालेल्या मुद्देमालाची नोंद घेण्यात आली असून, पुढील तपासासाठी तो ताब्यात घेण्यात आला आहे.

हेही वाचा : 'गुन्हे धुण्याचे वॉशिंग मशीन, राज्यात काय सुरु आहे?', पक्षांतरावरुन हायकोर्टाचे संतप्त सवाल

हे वाचलं का?