सिया अन् चेतनने सगळा प्लॅन 'त्या' व्यक्तीला सांगितलेला, केतनच्या हत्याप्रकरणात नवे नाव समोर
ketan Agarwal murder case : केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासात आणखी एका तरुणाचे नाव समोर आले आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी कथित कटाची माहिती त्यालाही दिल्याचा तपासात दावा करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सिया अन् चेतनने सगळा प्लॅन 'त्या' व्यक्तीला सांगितला
केतनच्या हत्याप्रकरणात नवा अँगल समोर
ketan Agarwal murder case : केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासात आता एक नवा अँगल समोर आला आहे. या प्रकरणात आणखी एका तरुणाचे नाव तपासादरम्यान पुढे आले असून तो मुख्य आरोपी चेतन चौधरीचा वर्गमित्र असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चेतन चौधरी आणि सिया गोयल यांनी केतन अग्रवालच्या हत्येचा कथित कट या तरुणालाही सांगितला होता. तसेच 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर होणाऱ्या ट्रेकला सोबत येण्याची विनंतीही त्याच्याकडे करण्यात आली होती. मात्र त्याने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिल्याचे तपासातून समोर आले आहे.
हेही वाचा : काँग्रेसमधील मरगळ ते सरकारच्या दाव्यांची चिरफाड, सतेज पाटलांची सडेतोड मुलाखत
चेतन चौधरीशी 'त्याचा' नियमित संपर्क
तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब उघड झाली आहे. केतन अग्रवालची कथित हत्या झाल्यानंतर चेतन चौधरी सर्वप्रथम याच मित्राला भेटल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सिया गोयलनेही घटनेनंतर त्याच्याशी संवाद साधल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. संबंधित तरुण हा बीड जिल्ह्याचा रहिवासी असून सध्या पुण्यातील बालेवाडी परिसरातील एका खासगी कंपनीत नोकरी करत आहे. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून त्याचा चेतन चौधरीशी नियमित संपर्क असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.
हेही वाचा : Bishnoi Gang कडून आमदाराला धमक्या, पटोले अन् वडेट्टीवारांनी विधानसभेत आवाज चढवला










