मुलाच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ अन् नको ते मेसेज, महिलेच्या मानेवर हल्ला

मुंबई तक

Crime News : मुलाच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ आणि असभ्य मेसेज पाठवल्यानंतर पीडितेनं आरोपीला असं कृत्य करण्यापासून विरोध केला. मात्र, तिला विरोध करण हे महागात पडलं होतं. आरोपीने पीडितेवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्याच महिलेच्या मानेला मोठी दुखापत झाली. 

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

गावातील आठ जणांची आरोपी अशी ओळख

point

मोबाईल फोनवर अश्लील मेसेज आणि असभ्य संदेशासह शिवीगाळ

point

हल्ल्यात पीडितेच्या मानेला दुखापत 

Crime News : मुलाच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ आणि असभ्य मेसेज पाठवल्यानंतर पीडितेनं आरोपीला असं कृत्य करण्यापासून विरोध केला. मात्र, तिला विरोध करण हे महागात पडलं होतं. बिहारच्या गोपालगंजच्या फुलवारिया पोलीस ठाणे परिसरातील मादीपूर गावात आरोपीने पीडितेवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्याच महिलेच्या मानेला मोठी दुखापत झाली. 

हे ही वाचा : नागराज मंजुळेंच्या ‘खाशाबा’चा नादखुळा टीझर, हिरोच्या भूमिकेनं ताणली उत्सुकता; चित्रपट प्रदर्शनाची तारीख समोर 

गावातील आठ जणांची आरोपी अशी ओळख

कुटुंबीयांनी त्याला फुलवारिया येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. जिथे प्रथोमपचारानंतर डॉक्टरांनी तिला पुढील उपचारांसाठी गोपालगंज रुग्णालयात पाठवले होते. मादीपूर गावातील रहिवासी असलेल्या जखमी विजय चौहान आणि त्याची पत्नी ममता देवी यांनी गुरुवारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यात गावातील आठ जणांची आरोपी अशी ओळख समोर आली. 

मोबाईल फोनवर अश्लील मेसेज आणि असभ्य संदेशासह शिवीगाळ

संबंधघित प्रकरणात महिलेनं असा आरोप केला की, गावातील सुलेखन चौहान आणि गोलू चौहान हे तिचा मुलगा सूरज कुमारच्या मोबाईल फोनवर अश्लील मेसेज आणि असभ्य संदेशासह शिवीगाळ पाठवत होते. या प्रकरणाच्या चौकशीबाबत पीडिता आरोपींच्या घरी गेली होती. 

हल्ल्यात पीडितेच्या मानेला दुखापत 

संबंधित प्रकरणात असा आरोप करण्यात आला की, सुखन महातो, पत्नी रंजू देवी, लक्ष्मण महातो आणि त्याची पत्नी रुना देवी आणि इतरांनी दोन तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला केला होता. संबंधित प्रकरणात पीडितेनं आरोप केला की, चाकूच्या हल्ल्यात तिच्या मानेला गंभीर दुखापत झाली होती. 

हे वाचलं का?