50 वर्षीय वृद्ध महिलेचा तरण्याबांड पोरावर जडला जीव, प्रियकराच्या घरी जाऊन राहिली
Crime News : एका 50 वर्षीय महिलेचा एका तरुणावर जीव जडला होता. तिने कुटुंबाचा देखील विचार केला नाही, तिने पोलिसांना सांगितलं की मला उरलेलं आयुष्य त्याच मुलासोबत घालवायचं आहे. ती महिला एप्रिल महिन्यात पळून गेली आणि जून 2026 मध्ये पुन्हा पोलीस ठाण्यात आली, तेव्हा तिने याबाबत माहिती दिली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
50 वर्षीय महिलेचा एका तरण्याबांड मुलावर जीव
स्वत:च्या मर्जीने प्रियकराच्या घरी..
Crime News : एका वृद्ध महिला तरण्याबांड व्यक्तीच्या प्रेमात वेडी झाली होती. तिने समाजाचा कोणताही विचार केला नाही. तिने कुटुंबाचा देखील विचार केला नाही, तिचा तरुण मुलावर जीव जडला होता. महिलेनं पोलिसांच्या समोर सांगितलं की, ती आता आपले उरलेले आयुष्य आपल्या मित्रासोबत घालवणार आहे, असा तिने निर्णय घेतला. संबंधित महिला ही 50 वर्षीय आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील मथुरा येथील सुरीन ठाणे क्षेत्रातील एका गावाच घडली.
हे ही वाचा : चंद्रपूर : पाच वर्षीय चिमुरडीवर 65 वर्षीय वृद्धाचा बलात्कार.. भयंकर घटना
50 वर्षीय महिलेचा एका तरण्याबांड मुलावर जीव
ज्या वयात लोक नातवंडांना खेळवतात, तर काही महिला या आध्यात्मिक जीवन जगतात. मात्र अशातच एका 50 वर्षीय महिलेचा एका तरण्याबांड मुलावर जीव जडला होता. त्या महिलेला आयुष्यभर त्या तरुणासोबत राहायचे होते. त्या महिलेला तीन अपत्य आहेत. त्यापैकी दोन मुलंचा विवाह झाला आहे, तसेच एक मुलगी विवाह करण्यायोग्य आहे. 19 एप्रिल रोजी महिला घर सोडून निघून गेली.
तपास करून देखील महिला कुठेच सापडली नाही. महिला बेपत्ता झाल्याची स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी महिलेचा शोध घेण्यास सुरूवात केली होती. अचानकपणे महिला 26 जून रोजी शुक्रवारी अचानकपणे पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.
हे ही वाचा : 4 वर्षीय चिमुकलीवर 62 वर्षीय वृद्धाकडून लैंगिक शोषण अन्..
स्वत:च्या मर्जीने प्रियकराच्या घरी..
तक्रारीत महिलेनं म्हटलं होतं की, ती स्वत:च्या मर्जीने अलीगढ येथील रहिवासी असलेल्या तिच्या प्रियकराच्या घरी राहत होती. पोलिसांनी अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला तरीही, तिच्या प्रियकरासोबत राहण्यावर ती ठाम राहिली होती. खैरा चौरीचे प्रभारी भूपेंद्र सिंह सिरोही यांनी सांगितलं की, महिला ही तिच्या प्रियकरासोबत राहण्यावर आग्रही राहिली आहे. न्यायालायता दिलेल्या तिच्या जबाबाच्या आधारे पुढील कारवाई केली जात आहे.










