Personal Finance: महिन्याची SIP तारीख बदलल्याने खरंच मिळतो का जास्त पैसा?

रोहित गोळे

SIP Date: महिन्याची SIP तारीख बदलल्याने जादुई पद्धतीने परतावा वाढत नाही. SIP च्या यशामागे तारीख नसून नियमित गुंतवणूक, दीर्घकालीन दृष्टीकोन आणि आर्थिक शिस्त हे तीन घटक सर्वात महत्त्वाचे असतात.

ADVERTISEMENT

personal finance does changing monthly sip date really affect returns
Personal Finance
Google CTA

Personal Finance Tips for SIP Date: म्युच्युअल फंडातील सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा सर्वात लोकप्रिय मार्ग मानला जातो. मात्र, SIP सुरू करताना किंवा नंतर अनेक गुंतवणूकदारांच्या मनात एक प्रश्न कायम असतो की, महिन्याची SIP तारीख बदलल्याने परतावा वाढतो का?

सोशल मीडियावर अनेकदा 'महिन्याच्या सुरुवातीला SIP करा', 'पगारानंतर लगेच SIP करा', किंवा 'महिन्याच्या शेवटी SIP केल्यास जास्त युनिट्स मिळतात' असे विविध दावे केले जातात. पण प्रत्यक्षात या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.

SIP ची तारीख परतावा ठरवत नाही

म्युच्युअल फंडातील SIP मध्ये प्रत्येक हप्त्याच्या दिवशी त्या दिवसाच्या Net Asset Value (NAV) नुसार युनिट्स खरेदी होतात. बाजार वर असेल तर कमी युनिट्स मिळतात आणि बाजार खाली असेल तर जास्त युनिट्स मिळतात. यालाच रुपी कॉस्ट अॅव्हरेजिंग (Rupee Cost Averaging) म्हणतात.

यामुळे महिन्याच्या 1, 5, 10, 15 किंवा 25 तारखेला SIP असली तरी दीर्घकालीन म्हणजे 10 ते 20 वर्षांच्या कालावधीत परताव्यामध्ये मोठा फरक पडत नाही. बाजारातील चढ-उतार कालांतराने सरासरी होत जातात.

हे वाचलं का?