डोंबिवलीत मुलांना खाऊ आणण्यासाठी गेली आई, विजेच्या झटक्यानं दुर्दैवी मृत्यू
Kalyan News : कल्याण पूर्व भागात डोंबिवलीच्या हनुमान नगर परिसरातून मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुसळधार पाऊस सुरू असताना आई आपल्या मुलांसाठी खाऊ आणण्यास गेली असता, विजेच्या झटक्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दोन मुलांना खाऊ आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेचा मृत्यू
महावितरणाच्या कामगिरीवर स्थानिकांचा संताप
Kalyan News : कल्याण पूर्व भागात डोंबिवलीच्या हनुमान नगर परिसरातून मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुसळधार पाऊस सुरू असताना आई आपल्या मुलांसाठी खाऊ आणण्यास गेली असता, वीज कोसळून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली होती. महावितरणाच्या निष्काळजीपणातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. महावितरणाच्या कारभावार नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
हे ही वाचा : नागराज मंजुळेंच्या ‘खाशाबा’चा नादखुळा टीझर, हिरोच्या भूमिकेनं ताणली उत्सुकता; चित्रपट प्रदर्शनाची तारीख समोर
दोन मुलांना खाऊ आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेचा मृत्यू
घडलेल्या घटनेनुसार, डोंबिवलीतील हनुमान नगर परिसरातील राहणार्या शशी राहुल चक्र (वय 42) या बुधवारी मृत्यू झाला. मुसळधार पाऊस सुरू असताना त्या आपल्या दोन मुलांना खाऊ आणण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. पाण्याला विजेचा संसर्ग झाल्याने विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्थानिकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रयत्न निष्फळ ठरले, या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
महावितरणाच्या कामगिरीवर स्थानिकांचा संताप
या घटनेनं परिसरात शोककळा पसरल्याचे वृत्त आहे. अशातच आता स्थानिकांनी महावितरणाच्या कामगिरीवर संताप व्यक्त केला आहे. महावितरणाचा निष्काळजी चव्हाट्यावर आल्याचे सांगण्यात येते. मृत महिला शशी चक्र यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबात पती राहुल चक्र, तसेच त्यांची दोन मुले असा त्यांचा परिवार होता. संबंधित प्रकरणाचा टिळकनगर पोलिसांनी तपास केला आहे, पोलीस मृत्यूमागील नेमकी परिस्थिती शोधत आहेत.










