मामाच्या घरी आला तरुण, मेहुणीवर लैंगिक अत्याचार, नवऱ्यानं डोळ्यानं पाहिलं

मुंबई तक

Crime News : मामाच्या घरी आलेल्या एका तरुणाने मामाच्या मुलाला फुल्ल दारू पाजून बेशुद्ध केलं. नंतर त्याला बेशुद्ध अवस्थेत सोडून, मेहुणीवर लैंगिक अत्याचार केला. नवरा जागा झाल्यानंतर पत्नी आक्षेपार्ह परिस्थितीत आढळून आली होती.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

महिलेवर लैंगिक अत्याचार होताना नवऱ्यानं पाहिलं... 

point

मामाच्या घरी आलेल्या तरुणाचं लज्जास्पद कृत्य

Crime News : उत्तर प्रदेशातील मथुरा पोलीस ठाणे परिसरात एका गावात लज्जास्पद प्रकार उघडकीस आला होता. मामाच्या घरी आलेल्या एका तरुणाने मामाच्या मुलाला फुल्ल दारू पाजून बेशुद्ध केलं. नंतर त्याला बेशुद्ध अवस्थेत सोडून, मेहुणीवर लैंगिक अत्याचार केला. नवरा जागा झाल्यानंतर पत्नी आक्षेपार्ह परिस्थितीत आढळून आली होती. त्याला पत्नी संबंधित तरुणासोबत आक्षेपार्ह परिस्थितीत आढळून आली. 

हे ही वाचा : 3 नराधमांनी तरुणीला हॉटेलवर नेलं, पीडिता नग्नावस्थेत... व्हिडिओ व्हायरल

आरडाओरड केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. पीडितेनं सांगितलं की, शनिवारी सायंकाळी 7 वाजता, भरतपूर जिल्ह्यातील रुपवास पोलीस ठाणे परिसरात येणाऱ्या मदाउली गावातील रहिवासी असलेल्या तिच्या पतीच्या मामाचा मुलगा विष्णू उर्फ विज्जो, तिच्या घरी आला होता. त्याने तिच्या पतीला अधिक दारू पाजून बेशुद्ध केले आणि छतावर बेशुद्ध अवस्थेत सोडून दिले. 

महिलेवर लैंगिक अत्याचार होताना नवऱ्यानं पाहिलं... 

रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तरुण तिच्या खोलीत शिरला आणि त्याने महिलेवर लैंगिक अत्याचार केला. पीडितेचा नवरा शुद्धीवर आल्यानंतर तो गच्चीवरून खाली आला आणि त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार होताना पाहिलं. तिने आरडाओरड देखील केली. आरोपी संधी साधून घटनास्थळावरून पळ काढला. पीडितेनं फराह पोलीस ठाण्यात विष्णविरोधात तक्रार दाखल केली. 

हे ही वाचा : बायकोच्या पोटात बाळ, डोहाळे जेवणादरम्यान नवऱ्याचा संशय, DNA ची मागणी अन्..

फराह पोलीस ठाणे प्रभारी छोटे लाल यांच्या माहितीनुसार, आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळून त्यांच्या मुसक्या आवळण्यात येतील. 

हे वाचलं का?