बायकोच्या पोटात बाळ, डोहाळेजेवणादरम्यान नवऱ्याचा संशय, DNA ची मागणी अन्..
Crime News : नातेसंबंधात विश्वास असणं फार गरजेचं असतं, पण नातेसंबंधाकडे काही लोक गांभीर्याने पाहत नाहीत. पती किंवा पत्नी एकमेकांवर संशय घेऊ लागतात. ज्यामुळे एक सुखी कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं. नवऱ्याने कसलाही विचान न करता बायकोच्या पोटात वाढणाऱ्या बाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला, असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पोटात वाढवणाऱ्या बाळावर प्रश्नचिन्ह
डीएनए चाचणीची नवऱ्याकडून मागणी
Crime News : नातेसंबंधात विश्वास असणं फार गरजेचं असतं, पण नातेसंबंधाकडे काही लोक गांभीर्याने पाहत नाहीत. पती किंवा पत्नी एकमेकांवर संशय घेऊ लागतात. ज्यामुळे एक सुखी कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. असाच एक धक्कादायक प्रकार तेलंगणाच्या मेडक जिल्ह्यातून समोर आला आहे. पतीने केलेल्या चारित्र्यहननच्या आरोपांमुळे एक गर्भवती महिला दुखावली गेली की, तिने जीवन संपवलं. मृत महिलेच्या आई-वडील अत्यंत वाईट अवस्थेत असून रडत आहेत. दु:ख व्यक्त करत ते म्हणाले की, आपल्या मुलीचे लग्न ज्या मुलाशी होणार आहे, तो भविष्यात तिच्याशी वाईट वागेल की, नाही हे कोणत्याच मुलीच्या आई वडिलांना ठाऊक नसते.
हे ही वाचा : दारूच्या नशेत तरुण, कुऱ्हाडीने हल्ला करत वडिलांची निर्घृण हत्या
पोटात वाढवणाऱ्या बाळावर प्रश्नचिन्ह
गर्भवती तरुणीची ओळख सुष्मिता (वय 23) अशी पटली आहे. ती आता आपल्यात नाही, तिने चारित्र्याच्या संशयाचे आरोप केले. ही घटना तेलंगणातील मेडक जिल्ह्यात घडली होती. मृत महिला सुष्मिताचा नवरा अभिलाषने तिच्या पोटात वाढवणाऱ्या बाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सुष्मिताने 18 महिन्यांपूर्वी अलागर्दी मंडळातील गडीपेड्डापूर गावातील रहिवासी आहे.
डीएनए चाचणीची नवऱ्याकडून मागणी
सुष्मिताच्या आई जनाबाईच्या तक्रारीनुसार, अभिलाषने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला होता. नंतर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या छळ देखील करण्यात आला. अभिलाषची आई शशिरेखा देखील सुष्मिताला सातत्याने त्रास द्यायची. माहेरच्या मंडळींनी सांगितलं की, 23 जून रोजी सुष्मिताच्या डोहाळ जेवणाच्या समारंभाच्या तयारीची चर्चा करण्यासाठी तिच्या सासरच्या घरी गेले होते. बोलता बोलता त्यांच्यात वाद झाला, या वादात अभिलाष आपण होणाऱ्या बाळाचे वडील आहेत की नाही हे ठरवण्यासाठी डीएनए चाचणी करण्याची मागणी केली. गावातील वडीलधाऱ्यांनी हस्तक्षेप केला असता, काही वेळासाठी प्रकरण शांत करण्यात आले.
हे ही वाचा : नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा, पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय
दोन दिवसानंतर 25 जून रोजी, सुष्मिता तिच्या सासरच्या घरी मृतावस्थेत आढळून आली. तिने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. तिच्या आई-वडिलांचा देखील आरोप होता की, सततच्या अपमानामुळे तिला टोकाचं पाऊल उचलण्यास भाग पाडले गेले. अशातच तक्रारीच्या आधारे अलादुर्ग पोलिसांनी भारतीय न्याय दंड संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अभिलाष आणि त्याच्या आईला अटक केली.









