पुणे: माजोरडी सिया गोयल, पोलिसांसमोर कॅमेऱ्याकडे पाहून दाखवलं मधलं बोट!
siya goyal video: पुणे पोलिसांनी आरोपी सिया गोयलला तिच्या घरी नेलं होतं. घराच्या आतने पोलिसांनी सियाची पुन्हा एकदा चौकशी केली. परंतु जेव्हा पोलिसांनी सियाला घरातून बाहेर आणलं तेव्हा सियान मुजोरी दाखवायला सुरुवात केली.
ADVERTISEMENT

पुणे: केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिने पोलिसांच्या ताब्यात असताना पत्रकारांच्या दिशेने अश्लील हातवारे केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे नव्या वादाला तोंड फुटले असून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, या व्हिडिओची सत्यता आणि त्यामागील परिस्थितीबाबत पोलिसांकडून अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही.
नेमकं काय घडलं?
तपासाचा भाग म्हणून पुणे पोलिसांनी सिया गोयलला तिच्या घरी नेले होते. घरामध्ये काही वेळ चौकशी केल्यानंतर पोलिसांनी तिला पुन्हा बाहेर आणले. यावेळी ती पोलिसांच्या संरक्षणात वाहनाकडे जात असताना उपस्थित पत्रकारांच्या दिशेने हाताचं मधलं बोट दाखवत अश्लील हातवारे केले. तिचं हेच कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यावरून विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
व्हिडिओवरून सोशल मीडियात चर्चा
व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर अनेक सोशल मीडिया युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांच्या उपस्थितीत अशा प्रकारचे वर्तन झाल्याने कायद्याबद्दलचा धाक राहिला आहे का, असा प्रश्न काही जण उपस्थित करत आहेत.










