'अहो..आज व्रत आहे', बायको संबंध टाळायची; शेवटी दाढी करताना सापडली अन् सगळं उलगडलं
Crime News : सोशल मीडियावर झालेली ओळख एका धक्कादायक हत्याकांडात बदलल्याचा प्रकार गुजरातमधील राजकोट ग्रामीणमध्ये उघडकीस आला. फेसबुक-इन्स्टाग्रामवरील बनावट ओळखीमुळे सुरू झालेलं नातं अखेर हत्येपर्यंत पोहोचलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'अहो..आज व्रत आहे', बायको संबंध टाळायची
एकदा दाढी करताना सापडली अन् सगळं उलगडलं
Crime News : सोशल मीडियावरील ओळख कशाप्रकारे एका भीषण हत्याकांडात बदलू शकते, याचं धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर एका तरुणाने स्वतःला तरुणी असल्याचं भासवत दुसऱ्या तरुणाशी मैत्री केली. या ओळखीचं पुढे इतकं रूपांतर झालं की दोघे पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहू लागले. मात्र, ज्याला तो तरुणी समजत होता, ती प्रत्यक्षात पुरुष असल्याचं समोर आल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि त्याच वादाचं पर्यवसान हत्येत झालं. या प्रकरणाचा उलगडा पोलिसांनी केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा : 'तुम्ही पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांचे गुलाम नाहीत, जनतेचे सेवक आहात' हायकोर्टाने पोलिसांना फटकारले
पीयूषने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा
25 जून रोजी रेल्वेच्या भिंतीलगत महिलांचे कपडे परिधान केलेल्या एका अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, फॉरेन्सिक शवविच्छेदन अहवालात डोक्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा असल्यामुळे हा खून असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि मानवी गुप्त माहितीच्या आधारे पोलिस उत्तर प्रदेशातील 20 वर्षीय पीयूष कुमार खरवारपर्यंत पोहोचले. चौकशीदरम्यान पीयूषने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.
हेही वाचा : अबब..! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या जळगावातील घरात 1.5 कोटींची रोकड, अर्धा किलो सोने...मोठं घबाड










