एकतर्फी प्रेमातून हैवान बनला तरुण, 26 वर्षीय तरुणीसोबत भयंकर घडलं!
Crime News : एकतर्फी प्रेमातून संतप्त झालेल्या तरुणाने तरुणीच्या घरात पेट्रोल टाकून आग लावल्याची धक्कादायक घटना ओडिशातील राउरकेला येथे घडली. या घटनेत 26 वर्षीय तरुणी 40 टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
एकतर्फी प्रेमातून हैवान बनला तरुण,
26 वर्षीय तरुणीसोबत भयंकर घडलं!
Crime News : एका तरुणाने कथितपणे एकतर्फी प्रेमातून 26 वर्षीय तरुणीच्या घरात पेट्रोल टाकून आग लावल्याची घटना घडली. या घटनेत तरुणी सुमारे 40 टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. प्राथमिक तपासात आरोपी बराच काळ संबंधित तरुणीच्या मागे लागला होता. त्याला तिच्यासोबत प्रेमसंबंध ठेवायचे होते, मात्र तरुणीने त्याचा प्रस्ताव नाकारल्यानंतर त्याने संतापाच्या भरात हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा : नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा, पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय
खिडकीतून खोलीमध्ये पेट्रोल टाकले अन् पुढे काय घडलं?
शुक्रवारी उशिरा रात्री तरुणी तिच्या घरात झोपलेली असताना आरोपी तेथे पोहोचला. त्याने घराच्या खिडकीतून खोलीमध्ये पेट्रोल टाकले आणि त्यानंतर आग लावली. काही क्षणांतच आगीने संपूर्ण खोलीला वेढा घातला आणि तरुणी आत अडकली. आगीच्या ज्वाळांमध्ये सापडलेल्या तरुणीने मदतीसाठी मोठ्याने आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. स्थानिकांनी मोठ्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आणि तरुणीला घराबाहेर काढले. त्यानंतर तिला तातडीने राउरकेला येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ती सुमारे 40 टक्के भाजली असून तिच्यावर डॉक्टरांकडून सातत्याने उपचार सुरू आहेत.
हेही वाचा : माहीम : धक्का लागल्याने चाकू हल्ला, माफी मागूनही विषय मिटला नाही; स्थानकाबाहेर काय घडलं?










