बर्थडे पार्टीच्या बहाण्याने बोलावलं, अन् घात झाला, तीन मित्रांनी मिळून केला मर्डर

मुंबई तक

Crime News : वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान झालेल्या वादानंतर 28 वर्षीय तरुणाची चाकूने हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

बर्थडे पार्टीच्या बहाण्याने बोलावलं

point

अन् घात झाला, तीन मित्रांनी मिळून केला मर्डर

Crime News : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे गुरुवारी पहाटे 25 वर्षीय मोहित शर्मा या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास क्रॉसिंग रिपब्लिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यू शांतिनगर परिसरात घडली. या प्रकरणात शेजारी राहणारे गौरव, देव, हरी आणि त्यांच्या इतर मित्रांवर हत्येचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. या हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मृताच्या कुटुंबीयांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा : "रिअ‍ॅलिटी त्यांनाही माहितीये अन् मलाही..", शिंदेंच्या मुख्यमंत्री बनण्याच्या महत्त्वाकांक्षेवर फडणवीस स्पष्टच बोलले

वाढदिवसाची पार्टी असल्याचे सांगून बोलावलं अन् केला खून 

मोहितच्या हत्येनंतर संतप्त कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या घटनेच्या निषेधार्थ त्यांनी रस्ता रोको करत संताप व्यक्त केला. त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मोहित आणि आरोपींमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता. काही दिवसांपूर्वी दोन्ही बाजूंमध्ये वाद झाल्यानंतर तो मिटल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, वाढदिवसाची पार्टी असल्याचे सांगून मोहितला बोलावण्यात आले आणि त्यानंतर त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

हेही वाचा : 'जेव्हा प्रेमाची गरज होती, तेव्हा प्रेमभंग केला..' मुंबई Tak बैठकीत CM फडणवीसांचे ठाकरेंना टोल्यांवर टोले!

हे वाचलं का?