कुुटुंबियांनी नकार देताच बॉयफ्रेंडने अंजलीला क्रूरपणे संपवलं, प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट!
bengaluru double murder : बंगळुरूमध्ये रविवारी रात्री काही तासांच्या अंतरात दोन वेगवेगळ्या हत्या प्रकरणांनी खळबळ उडाली. तर तुमकुरूमध्ये कारमधील स्फोटात एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कुुटुंबियांनी नकार देताच बॉयफ्रेंडने अंजलीला क्रूरपणे संपवलं
प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट!
bengaluru double murder : बेंगळुरूमध्ये रविवारी रात्री अवघ्या काही तासांच्या अंतरात दोन वेगवेगळ्या हत्या प्रकरणांनी खळबळ उडाली आहे. पहिल्या घटनेत एका तरुणाने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे, तर दुसऱ्या घटनेत एका महिलेचा मृतदेह तिच्या भाड्याच्या खोलीत आढळून आला. या दोन्ही प्रकरणांचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून, हत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे. याशिवाय कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यात कारमध्ये झालेल्या स्फोटात एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाल्याची आणखी एक गंभीर घटना समोर आली आहे.
हेही वाचा : नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा, पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय
लग्नाच्या मुद्द्यावरून झालेल्या वादानंतर अंजलीची हत्या
महालक्ष्मी लेआउट परिसरात लग्नाच्या मुद्द्यावरून झालेल्या वादानंतर 23 वर्षीय अंजली हिची तिचा प्रियकर राजीव याने चाकूने वार करून हत्या केल्याचा आरोप आहे. अंजली आणि राजीव हे गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ एकमेकांच्या प्रेमसंबंधात होते. मात्र, आरोपीचा गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे अंजलीच्या कुटुंबीयांचा या नात्याला विरोध होता. लग्नाच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर काही मिनिटांतच पोलिसांनी राजीवला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा : RSS चं कौतुक केल्यानं काँग्रेससह राज ठाकरेंकडून टीकेची झोड, अखेर नांगरे पाटलांचं स्पष्टीकरण










